मुंबई : विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाने पुन्हा धक्का दिला आह़े  त्यांना डावलत भाजपने महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिली़  मुंबै बँक घोटाळय़ाचा आरोप झालेल्या प्रवीण दरेकर यांनाही पुन्हा उमेदवारी देऊन भाजपने घोटाळेबाज नेत्यांबाबत आपण वेगळे नाही, हा संदेश दिला आहे.

भाजपने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड या पाच जणांची उमेदवारी जाहीर केली. पक्षाने उमेदवारी देताना मराठा, धनगर, ब्राह्मण, ओबीसी हे जातींचे समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. मावळते आमदार विनायक मेटे, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. पक्षाच्या उमेदवारांच्या यादीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पगडा आहे. ‘‘पंकजा मुंडे यांना उमेदवारी द्यावी म्हणून फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले होते. पण, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला पंकजाताईंना वेगळी काही जबाबदारी सोपवायची असेल. यामुळे त्यांना उमेदवारी दिली नसावी’’, असे सांगत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंडे समर्थक नाराज होणार नाहीत याची खबरदारी घेतली.

BJP Shivsena Washim, Washim, Dalits Washim,
वाशीममध्ये भाजप व शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजीचे आव्हान, दलितांमध्ये रोषाची भावना; जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray rally in thane
ठाणे हे खोक्याचे केंद्र – उद्धव ठाकरे
Vinod Tawde pune, Mahayuti, Maratha Reservation,
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!
Supriya Sule comment on BJP, Supriya Sule,
१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
nashik east vidhan sabha
नाशिक पूर्वमध्ये भाजप-शरद पवार गटात वाद; वाहनाची तोडफोड, पैसे वाटपाची तक्रार

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. राज्यसभेप्रमाणेच भाजपने अतिरिक्त उमेदवार उभा केला आहे. पाचवा उमेदवार म्हणून फडणवीस यांचे निकटवर्तीय व आर्थिकदृष्टय़ा तगडे मानल्या जाणाऱ्या प्रसाद लाड यांना रिंगणात उतरविले आहे. बाहेरून मते आणण्याची जबाबदारी लाड यांच्यावर असेल. राज्यसभेत तिसऱ्या उमेदवाराचा प्रयोग यशस्वी झाल्यास विधान परिषदेत भाजपचा आत्मविश्वास वाढू शकेल. राज्यसभेत तीन तर विधान परिषदेत पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घोटाळय़ांचे आरोप केले जातात. घोटाळेबाज मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. मुंबै बँकेच्या घोटाळय़ात आरोप होणारे व बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या प्रवीण दरेकर यांना फेरउमेदवारी देऊन भाजपने आपणही वेगळे नाही हे दाखवून दिले.

पक्षात प्रस्थ वाढू नये आणि विरोधी पक्षनेतेपद द्यायला लागू नये, म्हणून राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याचे समजते. विधानसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत त्यांचा परळी विधानसभेतून उमेदवारीसाठी दावा असल्याने विधानपरिषदेसाठी त्यांचे तिकीट कापले गेले, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

विधानपरिषदेसाठी संधी मिळाल्यास सोने करीन, अशी भावना पंकजा मुंडे यांनी नुकतीच व्यक्त केली होती. पण ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून काही वर्षे व्यक्त होत आहे. वडील गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच त्या मोठा जनाधार असलेल्या ओबीसी समाजातील नेत्या आहेत. विधानपरिषदेची उमेदवारी दिल्यास त्यांना विधानसभेसाठी उमेदवारीचा दावा सोडावा लागला असता. त्याचबरोबर त्या २००९ पासून विधानसभेत निवडून येत असल्याने दरेकर यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद द्यावे लागले असते. विधानपरिषदेत दरेकरांच्या नेतृत्वाखाली काम करणे पंकजा मुंडे यांना मान्य होण्यासारखे नव्हते. त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळीतून लढण्यासाठी भाजपला मजबूत उमेदवाराचीही गरज आहे. त्यामुळे प्रदेश सुकाणू समितीकडून शिफारस होऊनही रात्री उशिरा पंकजा मुंडे यांचे नाव उमेदवार यादीतून कापले गेले. त्यामुळे मंगळवारी रात्री उमेदवारी यादीही जाहीर न होता बुधवारी सकाळी जाहीर झाली.

मित्रपक्ष नाराज

विधानसभेतील संख्याबळ घटल्याने भाजपने मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडले असून, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिलेली नाही. भाजपने आम्हाला वापरुन घेतले, अशी संतप्त भावना मेटे यांनी व्यक्त केली असून ते फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेणार आहेत. उमा खापरे या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, अन्य चारही उमेदवारांनी बुधवारी विधानभवनात जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले.