प्रदेशाध्यक्ष दानवे यांना डावलून मुंबई भाजपची स्वतंत्र ‘वॉर रुम’

भाजपमध्ये प्रदेश पातळीवरच्या ‘वॉर रुम’वरुन शीतयुध्द सुरु असून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना डावलून मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आपल्या कार्यालयात ‘स्वतंत्र वॉर रुम’ सुरु केली आहे. मुंबईची स्वतंत्र वॉर रुम नसावी, अशी दानवे यांची भूमिका असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर अ‍ॅड. शेलार यांनी गेल्या आठ-दहा दिवसांपासून ही वॉर रुम सुरु केली आहे.

BJP boycotts visit of Buldhana Guardian Minister and Rehabilitation Minister Makarand Patil
बुलढाणा : पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपचा बहिष्कार! युतीत विसंवाद
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…
Delhi Assembly Elections BJP Third Manifesto
भाजपचा तिसरा जाहीरनामा; तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन
congress mla vijay wadettiwar accused election commission of Acting on BJP s warnings
निवडणूक आयोग मनुवादी, भाजपच्या इशाऱ्यावर चालतो… वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे…
ajit pawar
उलटा चष्मा : भ्रष्ट असलो, तर काय बिघडले?
Dhananjay Munde
“पहाटेची शपथ घेऊ नका असं सांगितलेलं तरी…”, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
challenge for new Guardian Minister Chandrashekhar Bawankule is to maintain goodwill of leaders of constituent parties in mahayuti
अमरावतीत पालकमंत्र्यांसमोर महायुतीतील घटकांना सांभाळण्याचे आव्हान

मुंबईसह काही महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाताळण्यासाठी प्रदेश पातळीवर दोन-तीन महिन्यांपूर्वी ‘वॉर रुम’ सुरु करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी अध्यक्ष अमित शहा यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यासह मुंबईतील खासदार, मंत्री व निवडक नेत्यांची बैठक घेऊन रणनीती आखून दिली होती. आमदार मंगलप्रभात लोढा यांना वॉररुमचे प्रमुखपद देण्यात आले आहे. पण मुंबईची परिस्थिती वेगळी असून प्रत्येक विभागांची माहिती प्रदेश स्तरावर हे काम हाताळणाऱ्यांना नाही. त्याचबरोबर मुंबई अध्यक्षांचा त्यात फारसा सहभाग नसल्याने अ‍ॅड. शेलार हे काहीसे नाखूष होते, असे समजते.

निवडणुकीसाठी शेलार यांना स्वतंत्र रणनीती व तयारी करावयाची असल्याने त्यांनी दादर येथील मुंबई कार्यालयातून स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. येथील वॉररुम आठ-दहा दिवसांपूर्वी सुरु झाली आहे आणि प्रदेश वॉर रुमशी समन्वयातूनच काम करण्यात येणार असल्याचे व ती समांतर असल्याचे अ‍ॅड. शेलार यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

प्रदेशाध्यक्ष दानवे यांना मात्र मुंबईसाठीची स्वतंत्र वॉर रुम पसंत नसून प्रदेश पातळीवरच निर्णयप्रक्रिया हवी आहे. प्रदेश पातळीवरच्या वॉररुमला सर्वाधिकार देऊन केवळ अंमलबजावणी विभाग स्तरावर करावयाची, ही पध्दती काही नेत्यांना पसंत पडली नाही. रणनीती व तयारीच्या दृष्टीने विभागीय स्तरावर अधिकार हवे होते. त्यामुळे अ‍ॅड. शेलार यांना मुंबई प्रदेश कार्यालयात ‘सवता सुभा’ थाटण्यास पक्षाच्या उच्चपदस्थांकडून परवानगी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Story img Loader