राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर स्वतः अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व दावे फेटाळून लावत आपण राष्ट्रवादीतच असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर आता भाजपाने अजित पवारांच्या निमित्ताने शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

भाजपा नेते व प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, “मराठीत एक म्हण आहे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ सध्या संजय राऊत नेमकीच तीच भूमिका करताना दिसत आहेत. असंगाशी संग करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना स्वतःच्याच पक्षापासून बेदखल केले. आता त्यांची नजर महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर पडलेली दिसते. म्हणूनच अजित पवार यांच्या संदर्भातील पहिले विधान त्यांनी केले होते.”

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024
Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितली लोकसभेत भाजपाच्या पीछेहाटीची दोन कारणं; म्हणाले, “तेव्हा भाजपाचा एक उमेदवार…”!
Uddhav Thackeray on CM Post
Uddhav Thackeray : “माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पद घुसलंय…”, मविआतील मुख्यमंत्री पदाच्या रस्सीखेचवरून उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका!
Bala Nandgaonkar Statement on Uddhav and Raj Thackeray
Bala Nandgaonkar : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी असलेलं रक्ताचं नातं जपावं, अजूनही..”, कुठल्या नेत्याने केली विनंती?
Aditya Thackeray eknath shinde
Aditya Thackeray : “शिंदेंच्या दोन मंत्र्यांसह आठ जणांना परत यायचं होतं, पण…”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं आठवडाभरापूर्वी ‘मातोश्री’वर काय घडलं
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…

नेमकं प्रकरण काय?

अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या तर्कवितर्कांवर सामनातून भूमिका मांडण्यात आली. याशिवाय संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली. यानंतर अजित पवार यांनी इतर पक्षाचे लोक त्यांच्या विषयावर बोलतात म्हणून टीका केली होती. यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’चा रोख त्यांच्या (पवारांच्या) घरातल्या भांडणावर होता. त्यामुळे अजित पवारांनी संजय राऊतांवर राग व्यक्त केला. त्यांनी संजय राऊतांना तडकवलं आहे. अजित पवारांबद्दल बोलायचा अधिकार संजय राऊतला कोणी दिला. संजय राऊत ठरवणार का? अजित पवारांनी काय केलं पाहिजे, काय करू नये. म्हणूनच अजित पवारांनी आज सडकून उत्तर दिलंय, यानंतर राऊत ध्यानावर येतील, असं मला वाटतं.

अजित पवार काय म्हणाले होते?

“आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोक करतात. माझ्या पक्षात माझ्याबाबत आकस असणारं कुणी नाही. काही बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचे असल्यासारखं बोलतात. त्यांना कोणी अधिकार दिला माहिती नाही. पक्षाची बैठक होईल, तेव्हा याबद्दल चर्चा करणार आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं.

हेही वाचा : Video: “माझ्याकडे पक्की माहिती आहे की…”, संजय राऊतांचा अजित पवारांबाबत दावा; म्हणाले, “आज सकाळी आम्ही…!”

“तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्याबद्दल सांगा. ज्या पक्षाचं मुखपत्र आहे, त्याबाबत बोला. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडण्यास खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र कोणी घेण्याचं कारण नाही. आमच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ते मग ते राष्ट्रीय किंवा राज्यातील स्तरावर मजबूत आहे,” असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांना खडसावलं.

संजय राऊतांचं प्रत्युत्तर

अजित पवारांनी खडसावल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले की, मी महाविकास आघाडीची बाजू मांडतोय. आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. या आघाडीचं रक्षण करणं आमचं काम आहे. अजित पवारही या आघाडीचे चौकीदार आहेत. अजित पावारांनी माझ्यावर टीका केली की नाही ते मला माहिती नाही. आम्ही त्यांच्या बदनामीवर भूमिका मांडली. ही बदनामी योग्य नाही असं आम्हाला वाटतं. शिवसेना फोडल्यानंतर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका घेतली होती. यावेळी देखील तसाच प्रयत्न राष्ट्रवादीबाबत सुरू होता. त्यामुळे आम्ही भूमिका घेतली. यात चुकीचं काय आहे.