केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही क्षेत्रांना मदतीचा हात देण्यात आला आहे. तर काही क्षेत्रात बदल करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पाबद्दल नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली असून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. “जगातील सर्वच देश करोनामुळे आर्थिक संकटात सापडले असताना भारताने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा निर्धार या अर्थसंकल्पात केलेला दिसून येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, मरगळलेल्या सर्वच क्षेत्रांना मदतीचा हात देत, ‘बळ पंखांना दिले हे, घे भरारी आकांक्षांची’, ही काव्यपंक्ती वापर त्यांनी अर्थसंकल्पांवर मत व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“कोरोना संकट, त्यामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था, त्यातून निर्माण झालेले प्रश्न या पार्श्वभूमीवर आरोग्य, उद्योग आणि शेती, पायाभूत सोयीसुविधा या घटकांवर विशेष लक्ष देण्याची गरज लक्षात घेत अर्थसंकल्पात तरतुदी केल्या आहेत. त्यामुळे नव्या दशकाचा पहिला अर्थसंकल्प हा खूपच आश्वासक असून सर्वांनाच नवी उमेद देणारा आहे”, असे उपाध्ये म्हणाले.

“पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठी केलेल्या १३ क्षेत्रांची निवड करत पाच वर्षात १ लाख ९ कोटी रूपये खर्च करण्याची तयारी, आरोग्य क्षेत्राच्या बजेटमध्ये घसघशीत वाढ २.३८ लाख कोटी रुपयांची तरतूद, शेतकऱ्यांना दीडपड उत्पादन खर्चाच्या हमीभाव देणे, उज्ज्वला योजनेचा विस्तार करत एक कोटी लाभार्थ्यांचा सहभाग, रस्ते व रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी रोड प्लॅन २०३०, उद्योगांना उभारी देण्यासाठी तरतूद, रोजगार निर्माणासाठी भरभक्कम पावले हे अधोरेखित करणारे निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत. टेक्सटाईल पार्क्समुळे शेतकऱ्यांना मदत होईलच पण त्यामुळे रोजगारातही वाढ होईल. त्याशिवाय निर्यातीला देण्यात आलेल्या प्रोत्साहनामुळे आत्मनिर्भर भारत निर्माणाच्या दिशेने होणारी वाटचाल वेगाने होईल”, असे काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी नमूद करत त्याचे फायदे अधोरेखित केले.