पुणे महापालिकेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपा आणि शिवसेना नेते आमने-सामने आले असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जशास तसं उत्तर देण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली असून मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर द्यावं असं म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी ट्विटरला हल्ल्याचा एक व्हिडीओ शेअर केला असून आपल्या हत्येचा कट होता असा आरोप केला आहे.

“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा; दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता”

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत त्यांच्या गाडीमागे शिवसैनिक धावत असल्याचं दिसत आहे. यावेळी एका व्यक्तीच्या हातात मोठा दगड होता. हा व्हिडीओ शेअर करताना किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, ५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिका मुख्यालयात मला मारण्याचा शिवसेनेचा हेतू होता. संलग्न व्हिडिओ क्लिप पहा”.

नेमकं काय झालं ?

सोमय्या शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी जम्बो करोना रुग्णालयात घोटाळा झाल्याची तक्रार दिली. तिथून ते महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार होते, याची कुणकुण शिवसैनिकांना लागताच सुमारे १०० शिवसैनिक महापालिका आवारात दाखल झाले. सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना शिवसैनिकांनी त्यांना अडवले, ‘तुम्ही पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाही, निवडक प्रकरणावर का चर्चा करता,’ असा जाब त्यांनी विचारला. त्यावर सोमय्या यांनी ‘मला माहिती द्या, मी त्याबद्दलही प्रशासनाशी बोलतो’, असे सांगितले.

दरम्यान, जमलेले शिवसैनिक घोषणाबाजी करत सोमय्यांच्या दिशेने आले. सुरक्षारक्षकांनी घेराव घालून सोमय्या यांना महापालिकेच्या इमारतीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवून धक्काबुक्कीला सुरुवात केली. त्यामुळे परतताना पायऱ्या उतरताना सोमय्या खाली पडले.

किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर केदार शिंदेंचं ट्वीट; म्हणाले “पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून…”

या घटनेबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी आम्ही सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. सोमय्या यांच्या सुरक्षारक्षकांनीच त्यांना धक्काबुक्की केली, असा दावा केला. सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीबाबत भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा; दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता”

“शारिरीक इजा फार झालेली नाही. पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशाप्रकारे कट कारस्थान करतं. अमिताभ गुप्ता हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांनी राकेश वाधवानला पळवून लावलं होतं. सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालतही पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून रितसर कट रचला असल्याचं समोर आलं आहे. किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता,” असा दावा किरीट सोमय्या यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.

सोमय्यांना शिवसैनिकांकडून पुण्यात धक्काबुक्की

“उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत. कारण संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडले आहेत. अनिल परब यांच्यावर तर कारवाईच सुरु झाली आहे. संजय राऊत. अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा सहभाग सापडला आहे. त्यांनी ठरवून हे केलं,” असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा, दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता. हीच सूचन पोलीस आयुक्त आणि शहराध्यक्षांनाही दिली होती,” असंही ते म्हणाले आहेत.

“स्थानिक पोलीस नाही तर मुख्यमंत्री कार्यालय यामागे होतं. मुख्यमंत्री कार्यालयातून संजय राऊत, अनिल परब आणि पाटणकर या तिघांना वाचवण्यासाठी किरीट सोमय्याला दोन चार महिने शांत करण्याचा कट होता. किती मोठे दगड हातात होते. शनिवारी सुटु्टी होती. एक कर्मचारी कामावर नव्हता. मग हे १०० लोक आत कसे घुसले? शिवसेनेचे कार्यकर्ते हातात काठ्या दगड घेऊन कसे पोहोचले? झेड सेक्युरिटी असणाऱ्या व्यक्तीसाठी पोलिसांनी आधी जाऊन पाहणी करायची असते. त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच सीआयएसएफ कमांडो आत जाता. हे सर्व त्यांनी मिळून केलं,” असाही आरोप सोमय्यांनी केला.

“१०० लोक आत कसे गेले? आत गेल्यानतंर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आम्हाला गेटवर सांगितलं का नाही. बिल्डिंगच्या आत सगळे लपले होते. उद्धव ठाकरे इतके घाबरले की आता मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात खून, हत्या घडवत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला लाज वाटत आहे,” असं सोमय्या म्हणाले.