भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. तसेच यातील दोन नेते तुरुंगात असल्याचं सांगत उर्वरित १० नेते तुरुंगात जाण्यासाठी रांगेत उभे असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या नेत्यांची यादी घेऊन किरीट सोमय्या आज दिल्लीत जाणार आहे. ट्वीट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

देशमुख-मलिकांनंतर आता कोणाचा नंबर? किरीट सोमय्या म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे…”

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
Sanjay Raut on Raj Thackeray
Sanjay Raut on Raj Thackeray: “राज ठाकरे भाजपाच्या हातातलं…”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांची टीका

किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, “ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे”. त्यामुळे किरीट सोमय्या आज कोणता नवा खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

काय म्हणाले होते किरीट सोमय्या?

किरीट सोमय्या म्हणाले होते, “मविआचे नेते कितीवेळा असं आंदोलन करणार आहेत? मी आजच डर्डी डझनची यादी जाहीर केली. त्यांच्यावर आधीच तपास आणि कारवाई सुरू आहे. या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परब आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झालीय. बेनामी रिसॉर्टमध्ये कायदेशीर कारवाई सुरू झालीय”.

“राऊतांच्या धडपडीवरून लक्षात येतं की आता कुणाची वेळ”

“संजय राऊत यांच्या धडपडीवरून लक्षात येतं की आता कुणाची वेळ आहे. त्यांचे पार्टनर सुजित पाटकर आहेत. कोविड हॉस्पिटल घोटाळा सिद्ध झाला आहे. यात उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुजित पाटकरला उत्तर द्यावं लागेल. भावना गवळी यांचा पार्टनर तर आतमध्ये आहे, आईचं नाव आरोपपत्रात आलं. आनंद आडसुळ यांच्याविरोधात आधीच अटक वॉरंट आहे,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं.

“किती वेळा धरणे धरणार?”

“अजित पवार यांचा जरेंडेश्वर कारखाना केव्हा जप्त होणार याची मी वाट पाहत आहे. हसन मुश्रीफ आधीच संकटात आहेत. प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड यांचा यात समावेश आहे. हे किती वेळा धरणे धरणार?” असा सवालही सोमय्यांनी केला होता.

सोमय्यांनी जाहीर केलेल्या ‘डर्टी डझन’मध्ये कोणाचा समावेश?

१. अनिल देशमुख
२. नवाब मलिक
३. अनिल परब
४. संजय राऊत
५. सुजित पाटकर
६. भावना गवळी
७. आनंद आडसुळ
८. अजित पवार<br>९. हसन मुश्रीफ
१०. प्रताप सरनाईक
११. रविंद्र वायकर
१२. जितेंद्र आव्हाड

“दोन गेले, १० जणांवर कारवाई सुरू”

“मविआचे १२ नेते कारवाईच्या रांगेत आहेत. ते कितीवेळा दबाव आणणार? पत्रकाराने सकाळी विचारलं ‘अब किस की बारी है’ मी म्हटलं चिठ्ठी टाकावी लागेल. दोन गेले, १० जणांवर कारवाई सुरू आहे,” असंही सोमय्यांनी म्हटलं होतं.

किरीट सोमय्या पुढे म्हणाले होते की, “उद्धव ठाकरे यांचा घोटाळा सिद्ध झालाय. गप्प बसले मुख्यमंत्री, हिंमत असेल तर उत्तर द्या. बायकोचं २०१९ चं बंगल्यासह ही जागा खरेदी केल्याचं पत्र खरं की पत्नीचं २०२१ चं आम्ही जागा घेतले तेव्हा बंगले नव्हते हे म्हणणं खरं? यातलं कोणतं पत्र खरं? उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर उत्तर द्या. म्हणून धरणे धरू द्या, कितीही दबाव आणला तरी फरक पडणार नाही.”

“संजय राऊत अधिकाऱ्यांच्या नावाने धमक्या देतात. किरीट सोमय्याला, पत्नीला आणि मुलाला जेलमध्ये टाकणार अशी धमकी दिली जाते. हे पवार आणि ठाकरेंना शोभतं का? आम्ही सर्व कुटुंब जेलमध्ये जायला तयार आहोत, पण हे डर्टी डझन महाराष्ट्राला लुटत आहेत. त्यांचा हिशोब होणार. डर्टी डझन ही केवळ १२ नावं नाहीत, तर त्यांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झालीय,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं.

“मी काय संजय राऊत नाही. चणेवाल्याकडे जाऊन दोन ट्रक रद्दीचे पेपर घेऊन जाणार. किरीट सोमय्याच्या कंपनीच्या एका पार्टनरचं नाव संजय राऊत सांगू शकले नाही. कुठे आहे वाधवान? असे फडतूस नाटकं, नौटंकी उद्धव ठाकरेंची माणसं करतात, आम्ही कागदपत्रांसह सांगतो. आता १२ नेत्यांपैकी पुढचा नंबर कोणाचा ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना काढू द्या. त्यांना ठरवू द्या कोणत्या नेत्याला आधी तुरुंगात पाठवायचं,” असं म्हणत सोमय्यांनी पवार-ठाकरेंना खोचक टोला लगावला होता.

Story img Loader