मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे यांच्यानंतर प्रदीप शर्मादेखील तुरुंगात जाणार असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापा टाकला असून कारवाई सुरु आहे. किरीट सोमय्या यांनी यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका करताना उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे एकामागोमाग एक जेलमध्ये जाणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्योगपती अंबानी धमकी प्रकरण तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएकडून तपास सुरु असून त्याच पार्श्वभूमीवर छापा टाकण्यात आला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाई सुरु असून प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांनी कारवाईवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “आधी शिवसेनेचे प्रवक्ते सचिन वाझे आतमध्ये गेले आणि आता शिवसेनेचे उपनेते प्रदीप शर्मा जेलमध्ये जाणार आहेत”. पुढे ते म्हणाले की, “मनसुख प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होत असली तरी सचिन वाझे यांनी अनिल परब- प्रदीप शर्मा यांच्याबाबत वसुलीसंबंधी जी माहिती दिली आहे त्यानंतर अनिल परब यांच्या घरीही तपास यंत्रणा पोहोचणार असून त्यावेळी मला आश्चर्य वाटणार नाही”.

अंबानी धमकी प्रकरण: प्रदीप शर्मांच्या घरावर NIA चा छापा; अटकेची शक्यता

“उद्धव ठाकरेंची जी गुंडसेना आहे त्यातील सगळे एकामागोमाग एक जेलमध्ये जाणार आहेत,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. “अनिल परब यांचा दापोली रिसॉर्ट घोटाळा जो काढला आहे त्यात सदानंद कदम त्यांचा पार्टनर आहे. सदानंद कदम याचा पार्टनर शिवसेनेचा शाखाप्रमुख असून त्यानेच मनसुखला मारण्यासाठी सचिन वाझेला वाहन दिलं होतं. त्यामुळे तुम्ही हे सर्व धागेदोरे पहा कसे आहेत. ही सगळी उद्धव ठाकरेंची माफिया सेना आहे,” असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- प्रदीप शर्मा यांच्या घरावर NIA ने छापा टाकल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आणखी वाचा- प्रदीप शर्मांनी केलेला भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न; अमित शाहांशीही झालं होतं बोलणं

आतापर्यंत काय झालं आहे

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात एनआयएने याआधी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली होती. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे.

शर्मा यांना बहुचर्चित रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया हत्येप्रकरणी (बनावट चकमक) अटक झाली होती. सुमारे तीन वर्षे ते कारागृहात होते. मनसुख हत्येप्रकरणी एनआयएने अटक केलेला निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे लखनभैया हत्या प्रकरणात सहआरोपी होता. या गुन्ह्यातून शर्मा वगळता उर्वरित सर्व आरोपींना(शिंदेसह) न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. निर्दोष मुक्त झाल्यानंतर शर्मा यांनाही पुन्हा सेवेत घेण्यात आले. सध्या चर्चेत असलेले परमबीर सिंह ठाणे शहरात पोलीस आयुक्त असताना शर्मा यांच्याकडे तेथील खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती.

आणखी वाचा- अंबानी धमकी प्रकरण: NIA ने ज्यांच्या घरावर छापा टाकला ते प्रदीप शर्मा आहेत तरी कोण?

शर्मा यांच्याकडे ७ एप्रिलला सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर ८ एप्रिलला त्यांना एनआयएने पुन्हा चौकशीस बोलावलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि जुने सहकारी सचिन वाझे यांना समोर आणून शर्मा यांच्याकडे एनआयएने चौकशी केल्याची माहिती मिळाली होती.