मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जागेची चाचपणी होत असल्याची माहिती समोर आली होती. आरेमधून कारशेडची जागा कांजूरमार्गला गेल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. मेट्रो कारशेडबाबत कांजूरमार्ग येथील जागेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो ३ चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आली. दरम्यान, यावरून आता भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“मेट्रोला गिरगावात विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर, एवढेच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर. प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच! आता मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये असा डाव आखला जातोय,” असा आरोप शेलार यांनी केला. “मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक,” असंही ते म्हणाले. शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली.

काय आहे प्रकरण?

मेट्रोचा हा प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असून यामुळे शहर व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांना सुविधा मिळणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर कारशेडची कांजूरमार्गला होणार असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर भाजपाने कडाडून टीका केली. तसंच हे प्रकरण न्यायालयात गेलं. कोर्टाने कांजूरमार्ग येथील कामाला स्थगिती दिली. नुकतंच पार पडलेल्या अधिवेशनातही फक्त अहंकारातून मेट्रो कारशेडची जागा ही आरेतून कांजूरमार्गला वर्ग करण्यात आली असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.