मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या असं आव्हान आज उद्धव ठाकरे यांनी भाजपाला आणि एकनाथ शिंदे सरकारला दिलं आहे. ज्यावर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पोस्ट लिहित जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच तुमच्या पराभवाची तुतारी, हार आणि सोनेरी पेढे यांची ऑर्डर दिली आहे असंही म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे आशिष शेलार यांनी

उध्दवजी…

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”

मुंबई महापालिकेची निवडणूक झालीच पाहिजे, लवकर झाली पाहिजे… या आपल्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

म्हणूनच तुम्ही वॉर्ड रचनेबाबत आपले बगलबच्चे राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी केलेल्या याचिका मागे घ्या…

तुम्ही जे घालवलेत त्या ओबीसीच्या आरक्षणाची याचिका ही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे..त्याचा निकाल न लागता, ओबीसीना आरक्षण न देता तुम्हाला निवडणुका हव्यात का?

आमच्या ओबीसींच्या पाठीत असा खंजीर खुपसणार का ? असा छुपा अजेंडा घेऊन का येताय? ” मर्दा” सारखे मैदानात या..

भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला हरवण्यासाठी पूर्ण ताकदीने सज्ज आहेत.

मी तर तुमच्या पराभवाचे ढोल, तुतारी आणि सोनेरी पेढ्यांची ऑर्डर देऊनच ठेवलेय.

तुमचे बोलघेवडे आणि आमचे ध्येयवेडे अशी लढत होऊनच जाऊ द्या..

लक्षात ठेवा विजय नेहमी ध्येयवेड्यांचाच होतो!

छत्रपतींचा आशीर्वाद मुंबईकरांची भाजपालाच साथ!

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“राजस्थान, छत्तीगसड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला भरघोस यश मिळालं आहे. आता, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा. एवढी तुमची लाट असेल, तर लोकसभेची एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. आमच्याही मनात काही शंका नको. सगळं वातावारण विरोधात आहे. एक्झिट पोल आणि उलटेपालटे करणारे निकाल लागत आहेत. मग, हे कसं घडलं? हा प्रश्न मतदारांना पडत असेल. ती शंका दूर करण्यासाठी एकच निवडणूक दम असेल, तर बॅलेट पेपरवर घ्या.”

Story img Loader