भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय. संजय राऊत शिवीगाळ करून उजळ माथ्याने फिरतात, तर गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसतात, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच गुन्हा दाखल न झाल्यास गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चित्रा वाघ म्हणाल्या, “गुलाबराव पाटील हा राज्याचा पाटील आहे. शिवसेनेच्या नेत्यांना नेमकं काय झालंय? संजय राऊतांनंतर आता गुलाबराव पाटील यांनी खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलंय. गुलाबराव पाटील आणि रांझ्याचा पाटील यांची वृत्ती एकच आहे. रांझ्याच्या पाटलाची पाटीलकी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती.”

“सरकार गुलाबराव पाटलांचं मंत्रीपद काढून घेणार आहे का?”

हे सरकार गुलाबराव पाटलांचं मंत्रीपद काढून घेणार आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलाय.

“…तर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”

“सर्वज्ञांनी संजय राऊत शिवीगाळ करूनही उजळ माथ्यानं महाराष्ट्रभर फिरत आहेत. दुसरीकडे गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत, पण महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणांना यात महिलांचा विनयभंग दिसत नाही. हे दुर्दैव आहे. माझं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आवाहन आहे की या गुलाबराव पाटलांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

“माझ्या वक्तव्याचा विपर्यास”, वादानंतर गुलाबराव पाटलांचं स्पष्टीकरण

गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यावर वाद झाल्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील एका कार्यक्रमात मी रस्त्यांबाबत वक्तव्य केले होते. चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्यामागे होती. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”

“प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे. तसेच महिलांविषयीही आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना होती, आजही आहे आणि यापुढेही राहील,” असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.