विधिमंडळाचे अधिवेशन संपताच भाजपाकडून मढमधील स्टुडिओप्रकरणी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या स्टुडिओच्या उभारणीत गैरव्यवहाराचा आरोप झाल्यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी सर्वांकष चौकशीची मागणी केली आहे. लाच, गुन्हेगारीच्या दृष्टीकोणातून या प्रकरणाचा तपास व्हावा, असेही त्यांनी म्हटले आहे. गैरव्यवहारातून उभा राहिलेला हा स्टुडिओ तोडण्यात यावा, अशी मागणी भातखळकरांनी केली आहे.

‘अल-कायदाप्रमाणे ऑपरेशन कमळची भीती’: ‘सामना’तील टीकेवर मुनगंटीवारांचा टोला, म्हणाले, “ते वर्तमानपत्र…”

“एमटीडीसीच्या ३८ हजार चौरस फुटांच्या जागेवर दीड लाख ट्रकांची भरणी करायला परवानगी देण्यात आली होती. या परिसरातील झाडे नष्ट करण्यात आली होती. या स्टुडिओ परिसरात आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांनी भेटी का दिल्यात हे शोधून काढले पाहिजे”, असे भातखळकर मढ परिसरात माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. सीआरझेडची परवानगी नसतानाही या बांधकामाला परवानगी कुणी दिली, कोणाच्या दबावामुळे दिली, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

“शिंदे गट ईडीच्या भयानं गुडघ्यावर गेला, तसे दिल्लीत…”, शिवसेनेची भाजपावर आगपाखड!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर या स्टुडिओप्रकरणी तब्बल १ हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. मढ परिसरामध्ये २८ स्टुडिओ आहेत. या परिसरात आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी जुलै २०२१ रोजी भेट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केली आहे. या दोन्ही तत्कालीन मंत्र्यांनी दादागिरी करून तात्पुरती परवानगी संपल्यानंतरही हे बांधकाम तोडले नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. या बांधकामाला बेकायदेशीर असल्याची नोटीस देऊन एक महिना झाला. पण अजूनही जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापालिकेचे अधिकारी काय करत आहेत, असा सवाल सोमय्यांनी विचारला आहे. या स्टुडिओच्या मालकांवर गुन्हा नोंदवा आणि कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Story img Loader