मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुटुंबियांसमवेतचा खासगी फोटो व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुकवर पसरविल्याप्रकरणी मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झाली आहे. याआधी नागपूरमधील नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचा खासगी फोटो व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक आणि ट्विटर या सोशल साईटवर पसरविण्यात आला. राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना मुख्यमंत्री अमेरिकेत कुटुंबियांसोबत बोटीवर मौजमजा करत आहेत, असा चुकीचा संदेश त्यात टाकून दिशाभूल करण्यात आली होती. त्याविरोधात भाजपाच्या वतीने मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ते छायाचित्र २०१२ मधील आहे.