मुंबई – माजी मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित दापोली येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याच्या प्रकियेला सुरूवात झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुरुडमधील वादग्रस्त रिसॉर्ट तोडण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. त्यावरुन आता पुन्हा भाजपाचे नेते किरीट सोमेय्यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, रिसॉर्टबाबतही मोठं व्यक्तव्य केलं आहे.

“अनिल परब यांचे ट्विन रिसॉर्ट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराचे स्मारक पाडण्याच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दिवाळीत हे दोन्ही ट्विन टॉवर जमीनदोस्त झाले पाहिजेत. अनिल परब, उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराचे स्मारक दिवाळीपर्यंत जमीनदोस्त झाले असेल,” असा दावा किरीट सोमय्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र किनारपट्टी विभागीय व्यवस्थापन प्राधिकरणाला ( महाराष्ट्र कोस्टल झोनल मॅनेजमेंट अ‍थॉरिटी) केंद्र गेल्या सरकारने २२ ऑगस्ट रोजी दापोलीतील साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार या प्राधिकरणाची जिल्हास्तरीय समिती आणि टास्क फोर्सची जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ( २९ ऑगस्ट ) बैठक झाली. यावेळी पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद ग्रामविकास विभागासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

दापोलीतील साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यासंदर्भात कागदपत्रेही प्रशासनाला पुरवली होती. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला होता. त्यानुसार रिसॉर्ट पाडण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा