मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची कथित चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार सोमय्या यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३८५ अन्वये गुन्हा नवघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमय्या यांच्या कार्यालयात एक मेल आला होता. त्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने त्यांची कथित अश्लील ध्वनिफित व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. ऋषीकेश शुक्ला नावाने हा ईमेल आयडी असून त्याद्वारे सोमय्या यांच्या कार्यालयाच्या ईमेल अॅड्रेसवर हा ईमेल मिळाला. याबाबत सोमय्या यांनी रविवारी स्वतः पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : करुणेची मात्रा वाढायला हवी! ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये पंकज त्रिपाठींचे प्रतिपादन

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील अश्लील आणि आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित केल्याबद्दल मराठी वृत्तवाहिनीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तीन दिवसांची बंदी घालण्यात आली होती. याप्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना आता सोमय्या यांनाच खंडणीसाठी ईमेल आला आहे. नवघर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून सायबर पोलीसही तपासाला मदत करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.