भाजप नेते आणि माजी आमदार मधू चव्हाण (६१) यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी चव्हाण यांच्यावर काळाचौकी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूर्वी भाजपत असलेल्या ५० वर्षीय कार्यकर्त्यां महिलेने ही तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २० वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून चव्हाण यांनी आपली फसवणूक करीत बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. भाजपचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
१९९३ पासून मधू चव्हाण यांनी आपल्याशी संबंध ठेवले होते. माझ्याशी ते लग्न करणार असल्याचे वारंवार सांगत होते. मात्र त्यांनी लग्न न करता आपली फसवणूक केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पक्षातील इतक्या ज्येष्ठ सदस्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं भाजपमध्येही खळबळ उडाली. चव्हाण यांनी हे आरोप फेटाळले असून राजकीय वैमनस्यातून ते करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा