बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा प्रस्ताव आणला. या प्रस्तावात महापालिकेच्या वैद्यकीय सेवेतील ४० ते ५० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर असल्याची टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
“उधार‘राजाचे जाहीर आभार”; उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा टोला
महापालिकेच्या वैद्यकीय सेवेतील ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाबाबत आणि पदभरती करण्याबाबत आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी. महापालिका रुग्णालयात किती पदे रिक्त आहेत? ती पदे भरण्यासाठी प्रशासनाने काय कार्यवाही केली? याबाबतची माहितीदेखील श्वेतपत्रिकेच द्यावी, अशी मागणीही भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आज स्थायी समितीत केली.
IND vs AUS: मुंबईचा हिटमॅन ‘जगात भारी’! ऑस्ट्रेलियाविरूद्ध केला विश्वविक्रम
“कोविड कालावधीत प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्षच केल्याचं धडधडीत सत्य समोर आलं आहे. करोना संसर्ग सुरू झाल्यामुळे येथील आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहराच उघड झाला. मुंबईची आरोग्यव्यवस्था भक्कम असल्याचा सत्ताधार्यांच्या भ्रमाचा भोपळा आता फुटला. गेली वर्षानुवर्षे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरण्याकडे प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या/ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. करोना संसर्गाच्या काळात रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, आरोग्यविषयक बाबींचे योग्य नियोजन करता यावे यासाठी अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत गरज भासते. यासाठी केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून आरोग्य व्यवस्थेचे हाल संपणार नाहीत. त्यासाठी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे” असं स्पष्ट मत प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केलं.