एपीआय सचिन वाझे प्रकरणावरून आज पत्रकारपरिषदेत बोलतान भाजपा नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री, शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागते? असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नितेश राणे म्हणाले, ”आता जो काही राज्यासमोर विषय गाजतो आहे, एक साधा एपीआय जेव्हा एवढं मोठं पाऊल उचलतो आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी किंबहुना त्याची वकिली करण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उतरतात, शिवसेनेचे नेते उतरतात. सामनाच्या संपादकापासून अन्य नेतेमंडळी सचिन वाझे किती चांगला आहे. सचिन वाझेची कशी चूक नाही, हे जेव्हा वकिली करण्यासाठी पुढं येतात, तेव्हा त्याच्या मागची काही कारणं आहेत. नेमकं त्याचीच वकिली यांना का करावी लागते? काय आहे असं या सचिन वाझेकडे? ज्यामुळे यांना हे सगळं पणास लावावं असं वाटतं. तर त्याचे काही विषय माझ्यासमोर आहे. या विषयावर आपल्याला थेट कळेल, की नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक साधा एपीआय सचिन वाझेची वकिली नेमकी आज का करत आहेत? याबाबत काही विषय मला आपल्यासमोर मांडायचे आहेत.”

आणखी वाचा- पीपीई किट घातलेली ती व्यक्ती वाझे की आणखी कुणी?; एनआयएकडून तपास सुरू

आणखी वाचा- घटनाक्रम! स्कॉर्पिओ, मनसुख हिरेन मृतदेह ते सचिन वाझेंना अटक; कोणत्या दिवशी काय घडलं?

”मागील वर्षी आयपीएलची मालिका आपल्य इथं खेळली गेली, साधरण सप्टेंबर ते नोव्हेंबर आयपीएल मालिका खेळली गेली. आय़पीएलच्या अगोदर, आयपीएलच्या नावाखाली जे काही विषय सुरू होते, ते या प्रकरणाशी कसे निगडीत आहे, ही माहिती मी सर्वांसमोर मांडणार आहे.आयपीएल साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत खेळलं गेलं. त्या अगोदर जे कीह बेटींगचं जे काही रॅकेट मुंबईत चालतं. हे सगळे जे बेटींगवाले आहेत, त्यांना आयपीएलच्या अगोदर त्या काळात सचिन वाझेचे फोन जातात, त्यांना सांगितलं जातं तुम्ही जे काही करतात. ती सर्व माहिती आमच्याकडे आहे.  पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला की मग ते घाबरणारच आणि मग त्यांना असं सांगितलं जात, की तुमची जी माहिती माझ्याकडे आहे त्या आधारावर आम्ही कारवाई करू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही आम्हाला १५० कोटी द्या. एकतर ही रक्कम पूर्णपद्धतीने माझ्याकडे पोहचवा नाही तर मी तुमच्यावर छापे मारणार. आणि मग मुंबई पोलिसांनी कसा या मोठ्या रॅकेट उघडकीस आणलं, अशा पद्धतीचं एक चित्र आम्ही रंगवू, तुमची बदनामी व तुम्हाला अटक आम्ही करू अशा पद्धतीची धमकी या लोकांना दिली गेली. १५० कोटी रक्कम त्यांच्यकडून मागितली गेली. वाझेनी ही रक्कम यांच्याकडे मागितल्याची माहिती आमच्याकडे आहे. वाझेनी ही रक्कम मागितल्यानंतर त्याला आणखी एका व्यक्तीचा फोन जातो व त्याच्याकडून आपल्या हिश्याची मागणी केली जाते. हा व्यक्ती म्हणजे विधीमंडळात मी ज्याचं नाव घेतलं. ज्यावर हे सरकार एवढं मेहरबान आहे, त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली आहे. तो कधी तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयात दिसणार, तर कधी अधिकाऱ्याला त्याचे फोन आलेले दिसणार, मुंबई महापालिकेच्या टेंडरमध्ये त्याचं नाव दिसणार हा जो काही वरून सरदेसाई आहे, याचं आणि वाझेमधलं जे संभाषण आहे. ते महत्वाचं आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे.”

Story img Loader