Vinod Tawade Mother Passed Away: भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांच्या आईचं निधन झालं आहे. विजया श्रीधर तावडे असं विनोद तावडे यांच्या आईचं नाव असून त्या ८५ वर्षांच्या होत्या. सोमवारी सायंकाळी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. भाजपा नेते विनोद तावडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
विनोद तावडे यांच्या आई विजया तावडे यांचं सोमवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. उद्या सकाळी ९ वाजता अमृत एन्क्लेव्ह, नेहरू रोड, विलेपार्ले पूर्व येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघेल.
याबाबत ट्वीट करत विनोद तावडे म्हणाले, “आपणास कळवण्यात अत्यंत दु:ख होत आहे की, माझी आई विजया श्रीधर तावडे यांचं मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झालं आहे.” विनोद तावडे यांच्या आईच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेक नेते, कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.