मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दरोडा किंवा चोरीसाठी तडीपार नव्हते. कुख्यात दाऊद इब्राहिमच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास घडविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी यांच्या पोलीस चकमकीप्रकरणात तडीपार होते. हे प्रकरण देशभक्तीचे लक्षण मानले जाईल, असे प्रत्युत्तर भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बुधवारी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहा हे गुजरातमधून तडीपार होते, असा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली होती. त्याला तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा >>> पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला

दाऊदच्या हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही, हे बहुदा पवार विसरले आहेत, अशी टिप्पणी तावडे यांनी केली. काळ्या पाण्याच्या किंवा दोन जन्मठेपेच्या शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर जर मंत्री झाले असते, तर त्यांच्याबाबतही पवार यांनी हेच वक्तव्य केले असते का? माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात १७ महिने तुरुंगात होते. ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधानही झाले. त्यांचा उल्लेखही पवार यांनी याचप्रकारे केला असता का, हे त्यांनी जनतेला सांगावे, असे तावडे यांनी म्हटले आहे.

Story img Loader