उमाकांत देशपांडे

मुंबई : भाजपने ‘महाविजय संकल्प २०२४’ अभियान जाहीर केले असून लोकसभा ४५ तर, विधानसभेसाठी २०० जागांचे लक्ष्य निश्चित केले आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीत लढून हा विजय संपादन करतील, असे जाहीर करण्यात आले असले तरी भाजपचे बाहू स्वबळावर सत्ता काबीज करण्यासाठी फुरफुरत असून हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी धोक्याचा इशारा आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
The murder of a minor girl will be tried in a fast track court thane news
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ

मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार राज्यात सत्तेवर असले तरी वरचष्मा भाजपचा असून केंद्रातील सत्तेमध्ये शिंदे गटाला अद्याप वाटा मिळालेला नाही. शिंदे यांच्याकडे सध्या ४० आमदार आणि १३ खासदार असून भाजप व शिंदे गटाचे जागावाटप जाहीर झालेले नाही. शिंदे गटाला लोकसभेसाठी १३ – १४ आणि विधानसभेसाठी ६०-७० जागांहून अधिक जागा भाजपकडून जागावाटपात मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजप लोकसभेसाठी ३४ आणि विधानसभेसाठी २०० हून अधिक जागा लढविण्याची शक्यता आहे.

भाजपचे महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळविण्याचे उद्दिष्ट आहे. १२२ पर्यंतचा टप्पा २०१४ मध्ये गाठला होता. भाजपने युतीत २०० जागा मिळविण्याचे उद्दिष्ट जाहीर केले असून, बाळासाहेबांच्या शिवसेनेला सत्तावाटपात फारसा अधिकार उरणार नाही.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाशिक येथील प्रदेश कार्यकारिणीत बोलताना ‘शत प्रतिशत भाजप’ च्या घोषणेचा जुना संदर्भ आपल्या भाषणात दिला, तरी तो बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी पुरेसा सूचक असल्याचे मानले जाते. मुख्यमंत्री शिंदे यांचे भाजप श्रेष्ठींशी सध्या चांगले संबंध असल्याने तेच २०२४ नंतर पुढील पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहतील आणि फडणवीस यांना लवकरच केंद्रात पाठविले जाईल, अशा राजकीय कंडय़ा सध्या एका गटाकडून पिकविल्या जात आहेत. भाजपने ३० वर्षे युतीत राहिलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शकले केली. तेव्हा शिंदे यांचीही ताकद २०२४ नंतर फार वाढणार नाही, उलट कमी होईल, याची काळजी भाजपकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.त्यासाठीच भाजपने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघात तयारी सुरू केली असून मतदान केंद्र निहाय कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत.

स्वबळावर सत्ता मिळविण्याचे लक्ष्य..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगले संबंध असलेल्या आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू, माजी संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्याकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकीची पूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप युतीची भाषा बोलत असला तरी कमळ चिन्हावर अधिकाधिक उमेदवार निवडून आणून स्वबळावर सत्ता मिळविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. त्यामुळे भाजपचे महाविजय संकल्प २०२४ अभियान हा बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी सूचक इशारा असून त्यांना भविष्यात आपले महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी व राजकीय भवितव्यासाठी झगडावे लागणार आहे.

Story img Loader