भाजपाने आज ३८ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मुंबईमध्ये महामेळावा आयोजित केला आहे. राज्यभरातील भाजपाचे जवळपास ५ लाख कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता असून भाजपाने या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाचा घाट घातला आहे. त्यामुळे मुंबईत काही भागांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वांद्रे-कुर्ला क्रीडा संकुलातील एमएमआरडीच्या मैदानावर सकाळी ११ वाजल्यापासून या मेळाव्याला सुरुवात होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाजपाने राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी विशेष रेल्वे गाडया, बसेसची व्यवस्था केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत पोहोचले असून ते या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा तसेच अलीकडेच मुंबईत झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यापेक्षा दुप्पट गर्दी जमवून विरोधकांना संदेश देण्याची भाजपाची रणनिती आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकत पणाला लावली आहे.

काल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. बाईकवरुन आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पाच तास वाहतूक कोंडी झाली. अनेकांना नियोजित वेळेत विमानतळापर्यंत पोहोचता आले नाही.

कशी आहे वाहतूक व्यवस्था
मुंबईत प्रवेश करणाऱ्या चार चेक नाक्यांवर मालवाहने आणि अन्य अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बेस्टकडूनही १७० जादा बसगाडय़ांचे नियोजनही करण्यात आले आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मोठय़ा संख्येने येणारे कार्यकर्ते आणि वाहने यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे. हे पाहता सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहनांसाठी नियमावली आखून देण्यात आली आहे. मुलुंड पूर्वेकडील आनंद नगर चेक नाका, मुलुंड पश्चिमेकडील मॉडेला चेक नाका, ऐरोली चेक नाका आणि वाशी चेक नाक्यांवर अवजड आणि मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासाठी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि नवी मुंबई पोलिसांनी अवजड आणि मालवाहतूक वाहनचालकांना अन्य मार्गाचा वापर करण्याची सूचना करण्यास सांगण्यात आले आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, एलबीएस रोडवरील सुर्वे जंक्शन, सायन जंक्शन, धारावी टी-जंक्शन, हंसभुग्रा मार्ग, सीएसटी रोड, नेहरू रोड, शारदादेवी रोडवरील प्रवास टाळा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पूर्व उपनगरातील जेव्हीएलआर, एलबीएस रोड आणि ईस्टर्न फ्री वे तर पश्चिम उपनगरातील एस. व्ही. रोड लिकिंग रोड वाहनचालकांसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि प्रवाशांनी त्याप्रमाणे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.

बेस्टच्या १७० जादा बसगाडय़ा
भाजपने राज्यासह अन्य भागातून मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी लांब पल्ल्याच्या २८ गाडय़ा आरक्षित केल्या आहेत. या गाडय़ांमधून मुंबईत दाखल होताच वांद्रे-कुर्ला संकुलात येण्यासाठी कार्यकर्त्यांना खासगी बस आणि बेस्ट बसचाही पर्याय दिला आहे. बेस्टकडून १७० बस गाडय़ा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.