मुंबई सुशोभीकरणाबाबत कोटेचा यांची आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांच्या निविदा प्रक्रियांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविला जात असताना मित्रपक्षाच्याच आमदाराने केलेल्या या आरोपांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
pune video
हे काय चाललंय पुण्यात! बेशिस्तपणाचा कळस; थेट फुटपाथवरून चालवताहेत गाड्या, VIDEO होतोय व्हायरल
yavatmal ashok uike loksatta news
यवतमाळ : शिस्तप्रिय भाजपमध्ये धुसफूस…मंत्र्याच्या सत्कार समारंभातच…
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
Gang terror in Warje area, Attack on youth with axe ,
पुणे : वारजे भागात टोळक्याची दहशत; तरुणावर कोयते, कुऱ्हाडीने वार
pune koyta gang latest marathi news
Pune Crime News : लोहगावमध्ये टोळक्याची दहशत; दहा वाहनांची तोडफोड, कोयते उगारुन तिघांना मारहाण
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

मुंबई पालिकेने संपूर्ण महानगराच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या निविदा विभाग पातळीवरून काढल्या जात आहेत. प्रकल्पाच्या लहानमोठय़ा निविदांमध्ये घोळ झाल्याचा आरोप यापूर्वी माजी नगरसेवकांनी केला होता. आता भाजपचे आमदार कोटेचा यांनीच या कामात काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त केला आहे. रस्त्यावर बसवण्यात येणाऱ्या बाकांच्या (स्ट्रीट फर्निचर) खरेदीसाठी मागवलेल्या २६३ कोटींच्या निविदा प्रक्रियेत अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे. ही निविदा प्रक्रिया रद्द करावी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी कोटेचा यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

शिवसेनेची सत्ता असताना भाजपने मुंबई महापालिकेत पहारेकरी म्हणून भूमिका बजावली होती व अनेक प्रकरणांतील भ्रष्टाचार बाहेर काढले होते. भाजपने पाठपुरावा केल्यामुळे अनेक प्रकल्पांच्या निविदा रद्दही कराव्या लागल्या होत्या. राज्य सरकारच्या संकल्पनेतील प्रकल्पात खालच्या स्तरावर कसा भ्रष्टाचार सुरू आहे, ते आयुक्तांच्या निदर्शनास आणण्यासाठी पत्र लिहिले असल्याचेही कोटेचा यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत प्रतिक्रियेसाठी चहल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आरोप काय?

  • रस्त्यांवरील बाकांसाठी २६३ कोटींचे काम कंत्राटदारांना  मिळावे यासाठी विशिष्ट अटींचा निविदेत समावेश
  • प्रकल्प केंद्रीय खरेदी विभागाच्या अखत्यारीत येत नसताना त्या विभागाकडून निविदा प्रक्रिया
  • विविध प्रकारच्या १३ वस्तूंसाठी एकच कंत्राटदार
  • तीन कंत्राटदारांपैकी दोघांना कामाचा अनुभव नाही
  • एकालाच काम मिळवून देण्यासाठी साटेलोटे असल्याचा आरोप

ही निविदा सुशोभीकरण प्रकल्पाचाच एक भाग आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करताना अधिकारी, अभियंते गैरव्यवहार करतात, असे पत्राद्वारे मी निदशर्नास आणून दिले आहे. गेल्या तीस वर्षांत भ्रष्टाचार करण्याची सवय असलेले अधिकारी आताही तशाच पद्धतीने काम करीत आहेत.

– मिहीर कोटेचा, आमदार, भाजप

Story img Loader