मुंबई : ‘आज दहीहंडीच्या दिवशी वरुणराजाने आशीर्वाद दिले असून राज्यासह मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. वरळीतील जांबोरी मैदानात आज परिवर्तनाची हंडी फोडली आहे. ही मुंबई मराठी माणसाची, मुंबईकरांची आहे. या मुंबई महानगरपालिकेला एक पक्ष, एक कुटुंब, एक आडनाव यांच्यापासून सुटका हवी आहे. आर्थिक गुंतवणूक हवी आहे. राजकारणाच्या वहिवाटीसाठी आपली मते घेण्यात आली, पण जवळीक मेहबुबाशी… त्यामुळे मेहबुबापासून सगळ्या लोकांना, ‘ऊबाठा’च्या लोकांना धडा शिकवायचा आहे’, असे खडे बोल मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार ॲड. आशिष शेलार यांनी विरोधकांना सुनावले.

हेही वाचा : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीत पहिल्यांदाच टेरेस फ्लॅट, पिंपरीतील घरांची किंमत एक कोटी ११ लाख रुपये

तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात व ‘बोल बजरंग बली की जय’च्या जयघोषात मुंबईसह राज्यात दहीहंडीचा थरार रंगला असून मुसळधार पावसातही उंचच उंच मानवी मनोरे रचले जात आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात वरळीतील जांबोरी मैदानात मुंबई भाजपतर्फे ‘परिवर्तन दहीहंडी’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परिवर्तन दहीहंडीचे आयोजन करून भाजपने थेट आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे. वरळीच्या जांबोरी मैदानातील भाजपच्या परिवर्तन दहीहंडीसाठी तब्बल ६६० हून अधिक गोविंदा पथकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. मुसळधार पावसामुळे जांबोरी मैदानात सर्वत्र चिखल पसरला आहे. परंतु या परिस्थितीतही गोविंदांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

Story img Loader