आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याच्या अंगावर धावून जात शर्ट खेचत मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे. काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मोहीम सुरू असताना हा प्रकार घडला. यानंतर अभियंत्याला मारहाण का केली असा प्रश्न आमदार जैन यांना विचारला असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्या मंगळवारी (२० जून) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

गीता जैन म्हणाल्या, “कायदेशीर असो की बेकायदेशीर, जूनमध्ये कोणतंही घर तोडायचं नाही असा शासन आदेश आहे. पावसाळ्यात अनधिकृत घरही तोडू शकत नाहीत. त्या अधिकाऱ्यांनी ते घर तोडलं. मी इंजीनियरला तिथं बोलावलं आणि पावसाळा असून तुम्ही हे घर का तोडलं असं विचारलं. घराच्या मालकाने त्याचं जे अनधिकृत बांधकाम होतं ते जेसीबी आणून तोडणार होता. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याचं पूर्ण घर तोडलं.”

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
sonu nigam met a child fan beatboxing
Video : छोट्या चाहत्यासाठी रस्त्यात थांबला सोनू निगम, टॅलेंटचं कौतुक केलं अन्…; त्याच्या ‘या’ कृतीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”

“…म्हणून मला राग आला आणि मी हात उचलला”

“पीडित घरातील महिला रडून आम्हाला मारलं, छळ केला, खेचून नेलं, असं सांगत होत्या. हा इंजीनियर उभं राहून त्या महिलेवर हसत होता. त्या महिलेचा किती अपमान करायचा? एका महिलेचं घर जातंय. त्यामुळे ती रडत आहे. अशावेळी हा इंजीनियर हसत होता. महिलेचा अपमान झाल्याने मला राग आला. म्हणून मी हात उचलला,” अशी माहिती गीता जैन यांनी दिली.

नेमकं काय घडलं?

काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. यावेळी एका झोपड्डीपट्टी बांधकामावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई करत असताना पालिका अधिकाऱ्यांनी नियामाचे पालन केले नसून केवळ विकासकाला फायदा पोहचवण्यासाठी हे बेकायदेशीर कृत्य केले असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत होता. याबाबत माहिती घेण्यासाठी आमदार गीता जैन गेल्या होत्या.

व्हिडीओ पाहा :

“पावसाळ्यात कुणाचंही घर तोडायचं नाही असा सरकारचा जीआर”

यावेळी व्हिडीओत गीता जैन अधिकाऱ्यांना म्हणत आहेत, “तुम्ही काय बोलले याच्याशी मला देणेघेणे नाही. तुम्ही घरमालकांना लेखी स्वरुपात काय दिलं ते मला दाखवा. मी सभागृहात याबाबत प्रश्न विचारणार आहे. पावसाळ्यात कुणाचंही घर तोडायचं नाही असा सरकारचा जीआर असताना आमचे दोन इंजीनियर जाऊन घरं तोडतात. लहान मुलांना खेचून घराबाहेर फेकतात.”

हेही वाचा : अंगावर गेल्या, शर्ट खेचला अन्…; आमदार गीता जैन यांची पालिका अभियंत्याला मारहाण

“तुम्ही राक्षस आहात का?”

“अरे काही माणुसकी आहे की नाही? तुम्ही राक्षस आहात का? तुम्हाला एवढी लहान मुलं दिसली नाहीत का? आज का तोंड बंद झालं आहे? त्या दिवशी तर ओरडत होतात ना. आता ओरडा,” असं बोलताना गीता जैन दिसत आहेत.

यावेळी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील हे हसत होते. त्यामुळे संतप्त जैन यांनी थेट पाटील यांच्या अंगावर जात त्याचा शर्ट खेचला आणि त्यांच्या कानाखाली मारली.