शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र नितेश राणे यांनी हायकोर्टातील अर्ज मागे घेतला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीन मानेशिंदे यांनी दिली आहे.

नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचं सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यांना तपासाला सामोरं जाण्याची इच्छा आहे”. हायकोर्टानेदेखील अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली आहे.

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ghost gun in us
‘Ghost Gun’ म्हणजे काय? गुन्हेगारांमध्ये याचा वापर का वाढतोय?
gurpatwant singh pannu in us
Gurpatwant Singh Pannu: भारताची मागणी अमेरिकेनं फेटाळली, गुरुपतवंतसिंग पन्नूच्या बँक खात्याची माहिती देण्यास स्पष्ट नकार!
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू

काय आहे प्रकरण ?

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मंगळवारी मोठा धक्का बसला. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता. मात्र यावेळी कोर्टाबाहेर नितेश राणेंची गाडी अडवण्यावरुन निलेश राणे आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली होती. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर संतोष परब यांच्यासाठी अ‍ॅड प्रदीप घरत तर आमदार राणे यांच्यासाठी अ‍ॅड सतीश मानशिंदे यांनी सोमवारी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाकडून निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आज सुनावणीदरम्यान कोर्टाने जामीन नाकारला. यानंतर नितेश राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली होती.

काय आहे प्रकरण –

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली होती. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेतलं. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती.

संतोष परब काय म्हणाले होते –

“दुचाकीवर असताना मला जोरात एका गाडीने धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की त्यामुळे मी रस्त्याच्या बाजूने फरफटत गेलो. माझ्या हाताला जखमही झाली आहे. फरफटत जाऊन मी एका बाजूला पडलो होतो आणि माझी दुचाकी माझ्या पायावर होती. ती एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा होती. पुढे जाऊन २०-२५ फुटांवर जाऊन थांबली. त्यातील एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि जाताना गोट्या सावंत, नितेश राणे यांना कळवलं पाहिजे असं म्हणत खिशातून मोबाईल काढला,” असं संतोष परब यांनी सांगितलं होतं.

Story img Loader