भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. कथित फसवणुकीच्या जुन्या प्रकरणी प्रसाद लाड यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. प्रसाद लाड यांची कोर्टात धाव घेतली असून पोलीस कारवाईची भीती असल्याने संरक्षण मिळावे अशी विनंती याचिकेतून केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून प्रसाद लाड यांना ओळखलं जातं. प्रसाद लाड यांनी २००९ साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी २०१४ मध्ये त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. प्रसाद लाड यांना गतवर्षी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) चौकशीसाठी समन्स बजावलं होतं.
एका कंत्राटात फसवणूक झाल्याच्या कारणाखाली पाच वर्षांपूर्वी तक्रार दाखल झाली होती आणि ते प्रकरण संपलेही होते.. आता पुन्हा ते उकरून काढून माझ्याविरुद्ध कारवाई करण्याचा घाट घातला जात आहे, अशी भीती प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे.