मुंबई : लोकसभेच्या सात टप्प्यातील निवडणूक प्रचारात कोणत्या टप्प्यात कोणते मुद्दे मांडायचे ही प्रचाराची दिशा आधीच निश्चित करण्यात आली होती. त्यानुसारच योग्य दिशेने प्रचार सुरू आहे. काँग्रेस किंवा अन्य विरोधकांनी मुद्दे दिल्याने त्याला आम्ही योग्य ते प्रत्युत्तर दिले. यामुळे भाजपचा प्रचार भरकटला हा विरोधकांचा आक्षेप पूर्णत: चुकीचा असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपला ३४० ते ३५५ आणि मित्र पक्षांना ७०पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्ष चारशे पारचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करतील, असेही तावडे यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांकडे काही मुद्दे नसल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अन्य नेत्यांकडून प्रचारात हिंदू-मुस्लीम मुद्द्यावर मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असला तरी त्यात काहीही तथ्य नाही.

हेही वाचा >>> ईशान्य मुंबईचे भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने; देवेंद्र फडणवीसांची मुलुंडमध्ये धाव

सात टप्प्यात मतदान होणार असल्याने प्रत्येक टप्प्यात कोणते मुद्दे मांडायचे याची रणनीती आखण्यात आली. प्रत्येक टप्प्यात मतदान होणार असलेली राज्ये आणि त्या त्या भागातील मतदारसंघांतील प्रश्न, सामाजिक समीकरणे या आधारे प्रचाराचे नियोजन करण्यात आले.

काँग्रेसचे सॅम पित्रोदा यांनी मालमत्ता वाटप आणि वांशिक मुद्द्यांवर केलेल्या विधानांमुळे आम्हाला उत्तर देण्यास संधीच मिळाली. मुस्लीम मतांसाठी हेमंत करकरे हे कसाबच्या नव्हे तर रा. स्व. संघाशी संबंधित पोलिसाच्या गोळीने मारले गेले, असा प्रचार वडेट्टीवार किंवा अन्य काँग्रेस नेत्यांनी केला. काँग्रेसचे हे मुस्लीम तुष्टीकरणाचे प्रयत्न आहेत हे आम्ही लोकांसमोर उघड केले.

अंबानी-अदानीवर राहुल गांधी मौन का बाळगतात हा मुद्दा जाणीवपूर्वक पंतप्रधान मोदी यांनी प्रचारात मांडला. कारण अदानीवरून संसदेचे कामकाज बंद पाडणारे काँग्रेस नेते प्रचारात अवाक्षर काढत नव्हते. काँग्रेसचे ढोंग आम्ही लोकांसमोर आणले. अशा वेळी भाजपचा प्रचार भरकटला म्हणणे हे चुकीचे आहे, अशी टीका तावडे यांनी केली.

●भाजपने कधीच न जिंकलेल्या १६० पैकी ६० ते ६५ मतदारसंघांत विजय मिळवू

●उद्धव यांनी संघाला बरोबर येण्याचे आवाहन केले. पण मुस्लीम मतांसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सहानुभूती कठीण.