मुंबई: हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे भाजप समर्थक खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा म्हणण्यसाठी जाणारच अशी भूमिका घेत अमरावतीहून मुंबईत दाखल झालेल्या राणा दांपत्याच्या निवासस्थानालाच शिवसैनिकांनी घेरल्याने हतबल होत राणा यांनी हे आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. समाजात द्वेष पसरविणारे वक्तव्य केल्यावरून मुंबई पोलिसांनी दोघांनाही अटक केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. जोवर मुख्यमंत्र्यांची माफी मागितली जात नाही तोवर राणा दांपत्याला घराबाहेर पडू देणार नाही अशी भूमिका परिवहनमंत्री अनिल परब यांनी जाहीर केली.

Story img Loader