मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वादात सापडलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे. मात्र भाजप नेत्यांची कृती लक्षात घेता पक्ष मुंडे यांच्याबाबत फार काही अनुकूल नसल्याचे नसून राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. भाजपचे आमदार सुरेश धसदेखील मुंडे यांच्या हकालपट्टीची सातत्याने मागणी करीत आहेत. ते रोज नवे आरोप करत असताना भाजपने त्यांना आवरलेले दिसत नाही. अभिनेत्री प्राजक्ता माळीला वादात ओढल्यावरून पक्षाने त्यांची कानउघाडणी केली व त्यांनीही दिलगिरी व्यक्त करून विषय संपविला. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे गंभीर आरोप करीत असताना भाजपकडून धस यांना मोकळीक कशी दिली जाते, असा सवाल केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>रेल्वे प्रवासात तरुणीचे कापले केस, रेल्वे पोलिसांनी आरोपीला केली अटक

बीडमधील गुंडगिरीविरोधात आवाज उठविणाऱ्या अंजली दमानिया यांना धमक्या आल्या असता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी पोलिसात धाव घेतली. मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या दमानिया यांच्या मदतीला भाजपच्या आमदार धावून गेल्याचे यामुळे दिसले. दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन कारवाईची मागणी केली. त्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्याबद्दल अजित पवार गटाकडून संशय व्यक्त केला जात आहे.