मुंबई : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत म्हणून विधानसभेत चांगल्या जागा मिळाव्यात यासाठी पक्षाच्या बैठकीत नेतृत्वाला आठवण करून दिली. त्यातून महायुतीत वाद निर्माण करण्याचा उद्देश नव्हता, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी स्पष्ट केले. तसेच महायुतीत भाजपची मोठ्या भावाची भूमिका योग्यच असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त चार जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील घातक उद्योगांचे पातळगंगा, अंबरनाथला स्थलांतर ; धोरण ठरविण्यासाठी तीन सचिवांची समिती

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत अशी नेतृत्वाला जाणीव करून देण्यासाठीच पक्षाच्या बैठकीत मी मत मांडले. त्यातून महायुतीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नव्हता. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी उगाचच माझ्या भूमिकेवर टीका केली आहे. मी जाहीरपणे मागणी केली नव्हती. पक्षाच्या व्यासपीठावर मत मांडले होते, असे भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादीने भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा भाजपच्या नेतृत्वाबरोबर सविस्तर चर्चा झाली होती. विधानसभेच्या ८० ते ९० जागा देण्याचा शब्द तेव्हा भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने आम्हाला दिला होता. याची आठवण आमचे नेते अजित पवार यांना करून दिली. विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यामुळेच जागावाटपात अधिक जागा मिळाल्या पाहिजेत ही भूमिका असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. महायुतीत भाजप हा मोठा भाऊ असेल ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका योग्यच आहे. कारण भाजपचे १०० पेक्षा अधिक आमदार आहेत. यामुळे भाजपला अधिक मिळणे हे क्रमप्राप्त ठरते. आम्हालाही योग्य जागा मिळाव्यात एवढीच अपेक्षा असल्याचे भुजबळ म्हणाले.

Story img Loader