आरोप असलेल्यांना उमेदवारी देऊन भाजपचे काँग्रेसीकरण केल्याची टीका
भ्रष्ट्राचाराला आपले सरकार थारा देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत असले तरी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने मुंब बँक घोटाळ्यातील वादग्रस्त ठरलेल्या प्रवीण दरेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने मुख्यमंत्र्यांचा दावा फोल ठरला आहे. दरेकरांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
केंद्रातील भाजप सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याबद्दल सरकारचा द्वितीय वर्धापनदिन साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठ थोपटून घेतली होती. गरव्यवहार सहन करणार नाही, असा दावा करत भाजप सरकारने महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भूजबळ यांना तुरुंगाची हवा खाण्यास भाग पाडले. तर अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या डोक्यावर चौकशीची टांगती तलवार ठेलली आहे. मात्र असे असले तरी भाजपने विधान परिषदेकरता मनसेतून आलेल्या प्रवीण दरेकर यांना पसंती दिली आहे. मुंब बँक घोटाळ्यात त्या बँकेचे अध्यक्ष म्हणून दरेकर यांच्यावर आरोप झाले होते. तसेच सहकार खात्याने केलेल्या चौकशीत दरेकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपने दरेकर यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्याच भाजपने पावन करून घेऊन दरेकरांना आमदारकीची संधी दिली आहे. आगामी मुंबई महापलिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने दरेकरांना संधी दिल्याचे बोलले जाते. मुंब बँकेच्या अध्यक्ष असलेल्या दरेकरांच्या आगामी निवडणुकीत ’पुरेपूर’ वापर करून घेतला जाईल. वर्षांनुवष्रे पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणारे प्रवक्ते माधव भंडारी यांची भाजपने पुन्हा एकदा घोर निराशा केली आहे.
सहस्त्रबुद्धे,महात्मे राज्यसभेसाठी
राज्यसभेसाठी सोमवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या नावाचा अखेर समावेश झाल्याने त्यांना न्याय मिळाल्याचे समाधान मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक केले जात आहे. तसेच तिसरे उमेदवार म्हणून डॉ. विवेक महात्मे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून उमेदवारी मिळवून दिली आहे. विविध क्षेत्रांत निरागसपणे काम करणारयांना संधी मिळावी या उद्देशानेच महात्मे हे पक्षाचे सदस्य नसले तरी त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला. राज्यातील धनगर समाजाच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या महात्मे यांना उमेदवारी देऊन भाजपने सामाजिक समतोलाचे गणित साधण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. राज्यसभेसाठी वेगवेगळ्या नावांचीही चर्चा होती.
कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींबरोबरच, विजय दर्डा हेदेखील भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. दत्ता मेघे यांच्याबाबतही तर्कवितर्क सुरू झाले होते. दरम्यान भाजपने विधान परिषदेसाठी सुरजित ठाकूर, प्रवीण दरेकर तसेच मित्र पक्षातील सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. वर्षांनुवष्रे कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या व गरव्यवहाराचे आरोप असलेल्या दरेकरांना उमेदवारी देऊन पक्षाने काँग्रेसपेक्षा वेगळे नाही, हा संदेश पक्षाने दिला आहे.
– विवेकानंद गुप्ता, सचिव, मुंबई भाजप