स्वपक्षीय नेत्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी भाजपकडून शनिवारी आमदार राज पुरोहित यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. पुरोहित यांनी कथित चित्रफितीमध्ये पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह विधाने केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे या नोटीसीत म्हणण्यात आले आहे. ही वक्तव्ये पक्षाच्या शिस्तीचा भंग करणारी आहेत. त्यामुळे पुरोहित यांनी तीन दिवसांत प्रदेशाध्यांक्षाकडे यासंबधीचे लेखी स्पष्टीकरण दयावे, असा आदेश भाजपकडून देण्यात आला आहे. तीन दिवसांत या नोटीसीला उत्तर न दिल्यास पुरोहित यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारीच याप्रकरणात तथ्य आढळल्यास पुरोहितांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

Story img Loader