मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची राष्ट्रीय पातळीवरील बैठक होणार आहे त्याच  गुरुवार व शुक्रवार अशा दोन्ही दिवशी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या महायुतीची मुंबईत बैठक होणार आहे. ‘इंडिया’च्या बैठकीला शह देण्याकरिताच भाजपने ही रणनीती आखल्याचे बोलले जाते.

हेही वाचा >>> बैठकीची सूत्रे शिवसेनेकडे, मसुद्याची जबाबदारी काँग्रेसवर, ‘इंडिया’ आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक

nda government set up a national commission to review the performance of constitution zws
संविधानभान : संविधानाच्या कामगिरीचा आढावा 
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
constitution of india article 351
संविधानभान: नियोजन आयोग: देशाचे होकायंत्र
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : आता तुमची पुढची भूमिका काय? छगन भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “निर्णय घेण्यासाठी माझी…”
Loksatta chadani chowkatun Rajya Sabha Prime Minister Narendra Modi Constitution Amit Shah
चांदणी चौकातून: कुठं आहे ती राज्यसभा?
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Winter session of Parliament postponed due to many controversial issues like Constitution Adani Dr Ambedkar
संसदेचे वादळी अधिवेशन संस्थगित

महायुतीच्या वतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारी इंडिया आघाडीची मुंबईतील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये बैठक होत आहे. महायुतीची बैठक वरळीच्या डोम सभागृहात होणार आहे. यामुळेच दोन्ही दिवस मुंबईत इंडिया विरुद्ध महायुती असे बैठकांचे सत्र असेल. इंडिया आघाडीच्या बैठकीला एकतर्फी प्रसिद्धी मिळू नये तसेच इंडिया बैठकीवरून लक्ष विचलित करण्याकरिता महायुतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या बैठकीची घोषणा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या बैठकीत राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष व काही ठरावीक नेतेमंडळींना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. सर्व ४८ मतदारसंघामधील राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेतला जाईल.

Story img Loader