शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पलफेक देखील केली. या घटनेमुळे एकच खबळबळ उडाली होती. शिवाय राजकीय वर्तुळात देखील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने कालच त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. मात्र आता या प्रकरणावरुन भाजपाने राज्याच्या गृहमंत्र्यांवर निशाणा साधलाय.
नक्की पाहा >> सिल्व्हर ओक आंदोलन Video: पोलीस कर्मचारी आंदोलनकर्त्या महिलेला धक्का देत असतानाच सुप्रिया सुळेंनी तिचा हात पकडला अन्…
पवारांच्या घरावरील हल्ला : विश्वास नांगरे पाटलांना आधीच होती कल्पना; भाजपाने पत्र शेअर करत केला गौप्यस्फोट
आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच भाजपाने हा दावा केलाय
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-04-2022 at 14:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp slams shivsena dilip walse patil over attack on sharad pawar home oppose appointment of vishwas nangare patil scsg