भाजप प्रदेशाध्यक्ष पदाबाबत १६ फेब्रुवारीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांची फेरनिवड होणार की देवेंद्र फडणवीस किंवा अन्य नावावर शिक्कामोर्तब होणार, याविषयी उत्सुकता आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष पदी आक्रमक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थपणे तोंड देईल व सर्वाना बरोबर घेऊन जाईल, असा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे. पक्षाच्या कोअर समितीची बैठक पार पडली असली तरी त्यात कोणताच निर्णय झालेला नाही. आगामी निवडणुकीसाठी सर्वाधिकार दिलेले ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व माजी केंद्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत १६ फेब्रुवारीला औरंगाबादला कोअर समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यावेळी प्रदेशाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

Story img Loader