सिंचन क्षेत्राबाबत श्वेतपत्रिकेत चुकीची आकडेवारी देऊन विधिमंडळ सदस्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करीत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याविरूध्द हक्कभंग प्रस्तावाची सूचना दिली आहे. तटकरे यांनी सभागृहात श्वेतपत्रिका सादर करून सिंचनाचे क्षेत्र ५.१७ टक्के असल्याचे म्हटले आहे. तर २०११-१२ च्या आर्थिक पाहणी अहवालात तसेच कृषी विभागाचे प्रधान सचिव गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी पाठविलेल्या पत्रातही सिंचन क्षेत्र ०.१ टक्के असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तटकरे यांनी विधिमंडळ सदस्यांना जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिल्याचे तावडे यांनी हक्कभंग प्रस्ताव सूचनेत नमूद केले आहे.

Story img Loader