मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली असून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून भाजपचे ४० नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. सध्या राज्यात डबल इंजिन सरकार असून महापालिका निवडणुकीनंतर ट्रिपल इंजिन सरकार आणून मुंबईचा विकास करणार, त्यासाठी महापालिकेची निवडणूक लवकर होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – वातावरणात ‘नाट्योत्सव’ रंगला; उरण येथील जेएनपीएच्या सभागृहात दर्जेदार लोकांकिकांचे सादरीकरण

हेही वाचा – मेट्रो प्रकल्प कामांचे वेळापत्रक करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पीयूष गोयल यांनी शनिवारी पालिका मुख्यालयात एका संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मुंबई महापालिका, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, एमएसआरडी, जिल्हाधिकारी आदी विविध प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत उत्तर मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड दरम्यानच्या या मतदारसंघातील आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा यांच्याशी संबंधित सर्व प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. उत्तर मुंबई मतदारसंघात विविध प्राधिकरणांची ६० हजार कोटींची कामे सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp targets 40 corporators from north mumbai mumbai print news ssb