मुंबई :  भाजपला ‘टीम नरेंद्र’, ‘टीम देवेंद्र’ मान्य नसून अशा टीममध्ये कोण आहे, याबाबत मला माहीत नाही. भाजप संस्कृतीला ‘मी’पणा मान्य नसून पक्षामध्ये प्रथम राष्ट्र, द्वितीय पक्ष आणि तृतीय मी असे तत्व आहे. पक्षात वरिष्ठ नेते चर्चा करुन निर्णय घेतात.  भाजपच्या कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नाही आणि पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार प्रीतम मुंडे यांचा  केंद्रीय मंत्रिमंडळात  समावेश न झाल्याने आपण नाराज असल्याच्या चर्चेचा पंकजा मुंडे  यांनी इन्कार केला.

‘ आपण, आम्ही’ असे संबोधन आम्हाला मान्य आहे. त्यामुळे कोणत्याही ‘टीम’ पक्षाला मान्य आहेत, असे मला वाटत नाही. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाची घडी बसवली, मी सुद्धा पायाला फोड येईपर्यंत प्रचार केला. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी पक्षासाठी आयुष्य वेचले असून भाजपला मला संपवायचे आहे, असे वाटत नाही, असेही त्यांनी  स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा यांची बहीण प्रीतम मुंडे यांच्याऐवजी  वंजारी समाजातीलच डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे.

दिल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. या पाश्र्वाभूमीवर पंकजाताईंनी आपली भूमिका स्पष्ट के ली. नाराजीचा इन्कार करतानाही त्यांच्या वक्तव्यातून असंतोष जाणवत होता.

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांनी मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले. भाजपची हीच भूमिका असून मी आणि केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलेले कार्यकर्ते आहोत, असे फडणवीस  यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp team devendra bjp cultural pankaja munde mp pritam munde union cabinet akp