Maharashtra Assembly Election 2024 Mahim Constituency Sada sarvankar vs Amit Thackeray : माहीम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमधील वातावरण तापलं आहे. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) येथून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीममधून विधानसभेचं तिकीट दिलं आहे. अमित ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचबरोबर भाजपाचीही त्यांना साथ मिळत आहे. त्यामुळे सदा सरवणकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी मनसे व भाजपा शिवसेनेवर (शिंदे) दबाव निर्माण करत आहेत. मात्र सरवणकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा-मनसेच्या दबावाला जुमानलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (२ नोव्हेंबर) सदा सरवणकर यांना त्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सदा सरवणकर यांनी आता थेट राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केलं आहे. दुसऱ्या बाजूला, मनसे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी आज भाजपा आमदार प्रसाद लाड यांची भेट घेतली. या भेटीनंतर लाड यांनी माहीम विधानसभेबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

आमदार लाड म्हणाले, अमित ठाकरे हा आमच्या कुटुंबातील मुलगा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. अमित ठाकरे राज ठाकरेंचा मुलगा असला तरी आम्ही त्याला आमच्या मुलासारखाच समजतो आणि या निवडणुकीत आम्ही राज ठाकरे यांना मदत करावी यावर ठाम आहोत. सदा सरवणकर हे शिवसेनेचे (शिंदे) ज्येष्ठ नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. विधानसभेवरील आमदार असो, अथवा विधान परिषदेवरील आमदार असो, शेवटी आमदार हा आमदारच असतो. सदा सरवणकर हे कित्येक वेळा जनतेतून निवडून विधानसभेवर गेले आहेत. यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांची समजूत काढता येईल. एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढून त्यांना विधान परिषदेवर संधी द्यायला हवी. यासह त्यांच्याकडे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचं अध्यक्षपद पाच वर्षांसाठी देण्यात आलं आहे. तसेच त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मला वाटतंय की सरवणकर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमची भूमिका मान्य करतील. भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही या निवडणुकीत अमित ठाकरे यांचा प्रचार करणार आहोत.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Yogi Adityanath Death Threat
Yogi Adityanath Death Threat : ‘१० दिवसांत राजीनामा द्या, अन्यथा बाबा सिद्दिकी यांच्यासारखा शेवट करू’; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा >> Eknath Shinde : माहीममध्ये महायुतीचा पाठिंबा कोणाला? सदा सरवणकरांना समर्थन की मनसेला साथ? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

सदा सरवणकर काय म्हणाले?

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सदा सरवणकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांनी मला आशीर्वाद दिला आहे. मी अर्ज भरल्यानंतर प्रचारही सुरू केला आहे. मी ज्या मतदारांसाठी गेल्या १५ वर्षांपासून काम करतोय तिथल्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्यावर ते प्रेम करतात. ते मला विजय मिळवून देतील. मी सामान्य घरातील माणूस आहे. ३० वर्षांपासून सेनेसाठी काम करत आहे. माहीम विधानसभेतील प्रत्येक गल्लीत, घरात माझ्या कामामुळे माझी ओळख निर्माण झाली आहे. काम करणाऱ्या व्यक्तीवर कोणीही अन्याय करत असेल तर त्यावर निश्चितच प्रतिक्रिया उमटणार आणि मतदारसंघातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Story img Loader