Maharashtra Assembly Election 2024 Mahim Constituency Sada sarvankar vs Amit Thackeray : माहीम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमधील वातावरण तापलं आहे. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) येथून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीममधून विधानसभेचं तिकीट दिलं आहे. अमित ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचबरोबर भाजपाचीही त्यांना साथ मिळत आहे. त्यामुळे सदा सरवणकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी मनसे व भाजपा शिवसेनेवर (शिंदे) दबाव निर्माण करत आहेत. मात्र सरवणकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा-मनसेच्या दबावाला जुमानलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (२ नोव्हेंबर) सदा सरवणकर यांना त्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सदा सरवणकर यांनी आता थेट राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केलं आहे. दुसऱ्या बाजूला, मनसे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी आज भाजपा आमदार प्रसाद लाड यांची भेट घेतली. या भेटीनंतर लाड यांनी माहीम विधानसभेबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा