डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांची ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून बदनामी करणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या डोंबिवलीतील चार पदाधिकाऱ्यांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून झालेल्या बदनामीवरून नगरसेविका कोठावदे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांच्याकडे तक्रार केली होती. चौकशीनंतर भाजप युवा मोर्चाचे डोंबिवलीतील पदाधिकारी मयूरेश शिर्के, दिनेश दुबे, रजत राजन आणि मयूरेश भाटय़े दोषी आढळले. पालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या आधी कोठावदे घरी आढळून न आल्याने आमदार रवींद्र चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. आपण कुटुंबीयांना सांगूनच बाहेर गेलो असताना चव्हाण यांनी बदनामी केल्याने कोठावदे म्हटले होते.

Story img Loader