मुंबई मेट्रोच्या वाढलेल्या खर्चाची भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) यांच्यामार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी मुख्य सचिवांना पत्र पाठवून केली आहे.
हा प्रकल्प गेली अनेक वर्षे रेंगाळला असून खर्च कोटय़वधी रुपयांनी वाढला आहे. कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हे चालले असून अधिकाऱ्यांची त्याला साथ आहे. खर्चाचे आकडे फुगविण्यात आले आहेत. त्यामुळे तिकिटाचे दर सुमारे ३०० पटीने वाढतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली़  त्यावर मेट्रो वन कंपनीने स्पष्टीकरण केले असून या मुद्दय़ांचा इन्कार केला आहे. एमएमआरडीए व राज्य सरकारच्या विलंबामुळे हा प्रकल्प रखडला. महागाई, परकीय चलनदर, आदी मुद्दय़ांमुळे हा खर्च वाढत गेला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

Story img Loader