मुंबई : ‘एमएमआर’मधील वाहतूक कोंडी सोडवून नागरिकांचा प्रवास सुकर, सुसाट करण्यासाठी, कोणत्याही ठिकाणांहून इच्छितस्थळी ५९ मिनिटांत पोहोचता यावे यासाठी मेट्रो, सागरी सेतू, उन्नत रस्त्यासह अन्य प्रकल्पांच्या कामाला वेग देण्यात येईल.

मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून ‘ग्रोथ हब’ संकल्पनेनुसार केला जाईल. नववर्षात विकास केंद्राच्या आराखड्यातील ३० प्रकल्पांच्या कामाला टप्प्याटप्प्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सुरुवात करेल. अटल सेतू प्रभावित क्षेत्रात तिसरी मुंबई अर्थात नवनगर वसविले जाईल. या नवनगरचा आराखडा तयार करून भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केली जाईल.

Adani s Dharavi slum redevelopment project marathi news
लाडक्या उद्योगपतीसाठी राजा उदार
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
स्वित्झर्लंडमध्ये हिजाब आणि बुरख्यावर का बंदी घालण्यात आली आहे? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Hijab ban in Switzerland : स्वित्झर्लंडमध्ये हिजाब आणि बुरख्यावर का बंदी घालण्यात आली आहे?
Satara District Collector Jitendra Dudi has been posted as Pune District Collector pune news
एकाच कुटुंबातील तीन अधिकारी पुण्याचा कार्यभार सांभाळणार; जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी
upasana singh rejected for maine pyar kiya role
“’मैने प्यार किया’साठी माझी निवड झाली होती पण…”, कॉमेडी नाइट्स विथ कपिल फेम अभिनेत्रीने केला खुलासा; म्हणाली, “मी सलमान खानपेक्षा…”
IND vs SA T20I Series Full Schedule With Date and Time with IST And Squads India South Africa
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?
stock market crash
शेअर बाजारात तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”

ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा, तसेच ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह बोगद्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्या वर्षात आरे-कुलाबा असा थेट भुयारी प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार असून दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी – कुलाबादरम्यानची भूमिगत मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहे.

हेही वाचा >>>२०२४ आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष, तापमानात आजपर्यंत सरासरी १.५ अंश सेल्सिअसने वाढ

एमएमआरमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. त्यानुसार एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विशेषत्वाने एमएमआरडीएकडून मेट्रोसह अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. त्यानुसार नव्या वर्षात एमएमआरडीएकडून कामे सुरू असलेली कोणतीही मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्याची चिन्हे नाहीत. यासाठी मुंबईकरांना २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

गृहनिर्मिती

एमएमआरमध्ये ३० लाख रोजगार निर्मितीसह आठ लाख घरांची निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. यादृष्टीने २०२५ मध्ये कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

नवनगरसाठी भूसंपादन

अटल सेतू प्रभावित क्षेत्रात नवनगर अर्थात तिसरी मुंबई विकसित करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात नवनगरासाठी भूसंपादनाच्या कामालाही सुरुवात होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पहिला टप्प्यातील स्मारक जानेवारीअखेरीस खुले होण्याची शक्यता आहे. तर वसई – विरार आणि मिरा – भाईंदरमधील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील पहिला टप्पा कार्यान्वित झाला असून त्याद्वारे वसई-विराराला पाणीपुरवठा केला जात आहे. आता दुसरा टप्पा येत्या काही महिन्यात पूर्ण करून मिरा-भाईंदरला मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे.

हेही वाचा >>>२ हजार कोटींचा एसटी घोटाळा

आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकास केंद्र

एमएमआरडीएकडून एमएमआरच्या विकासासाठी मेट्रोसह अनेक पायाभूत सुविधा विकास प्रकल्प राबविले जात आहेत. पण आता संपूर्ण एमएमआरचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक विकास केंद्र म्हणून विकास करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. निती आयोगाने एमएमआर ग्रोथ हबची शिफारस केली आहे. निती आयोगाच्या शिफारशीनुसार एमएमआर ग्रोथ हबचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता ग्रोथ हबमधील ३० प्रकल्पांना एक – एक करून नव्या वर्षात सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. एमएमआरचा २०३० पर्यंत आर्थिक विकास करून अर्थव्यवस्था मजबूत केली जाणार आहे.


मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी – कुलाबा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मार्च २०२५ मध्ये बीकेसी-आचार्य अत्रे, वरळी मेट्रो स्थानक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल. तर जून २०२५ आचार्य अत्रे, वरळी, मेट्रो स्थानक – कुलाबा टप्पा सुरू होईल. हे टप्पे सुरू झाल्यास आरे – कुलाबा असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करणे शक्य होणार आहे. एमएमआरडीएकडून सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या विस्तारीकरणाअंतर्गत वाकोला नाला ते पानबाई इंटरनॅशनल स्कुल दरम्यान उन्नत रस्ता बांधण्यात येत आहे. या रस्त्याचे काम नव्या वर्षात पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा उन्नत रस्ता खुला झाल्यास अमर महल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग असा प्रवास सिग्नल विरहित आणि केवळ ३० ते ३५ मिनिटांत करता येईल.

ठाणे – बोरिवली २० मिनिटांत

ठाणे – बोरिवली अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीचे कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. तर भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम नव्या वर्षात सुरू होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. पूर्वमूक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे ऑरेंज गेट येथे वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी दूर करून पूर्वमूक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना चर्चगेट, मरिन ड्राईव्हला अतिवेगाने जाता यावे यासाठी ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामासही २०२५ मध्ये सुरुवात करण्यात येणार असल्याचेही मुखर्जी यांनी सांगितले.

Story img Loader