Coldplay Ticket on Book My Show : कोल्ड प्ले हा जगभरात नावाजला गेलेला बँड जानेवारी २०२५ मध्ये नवी मुंबईत त्यांचा कार्यक्रम सादर करणार आहे. “म्युझिक ऑफ दी स्फीअर्स वर्ल्ड टूर २०२५” असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमाच्या तिकीटांची ऑनलाईन विक्री सुरू केल्यानंतर काही मिनिटात सर्व तिकीटं विकली गेली. या कार्यक्रमाच्या तिकीटासाठी चाहत्यांनी तब्बल ३ लाखांपर्यंतची रक्कम मोजली. दुसऱ्या बाजूला या कार्यक्रमाचं तिकीट मिळालं नसल्याने अनेक चाहते नाराज झाले आहेत. यामुळे बुक माय शो या संकेतस्थळाच्या मूळ कंपनीविरोधात पोलिसांनी समन्स बजावलं आहे. बुक माय शो वर प्रचंड टीका झाल्याने त्यांनी आता यासंदर्भातील निवेदन सादर केलं आहे.
बुक माय शोचा कोणत्याही अनधिकृत तिकिट विक्री आणि पुनर्विक्री प्लॅटफॉर्मशी संबंध नाही. याबाबत पोलीस तक्रारही केली आहे. बुक माय शोने असाही दावा केला आहे की सर्व अस्सल चाहत्यांना ब्रिटिश पॉप रॉक बँडच्या मैफिलीसाठी तिकिटे सुरक्षित करण्याची वाजवी संधी मिळावी यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ते अवैध किंवा बनावट असू शकतात असे सांगून अनधिकृत स्त्रोतांकडून पास खरेदी न करण्याबाबतही सूचना केली आहे.
मुंबई पोलिसांनी BookMyShow चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक आशिष हेमराजानी आणि त्याच्या तांत्रिक प्रमुखांना शुक्रवारी समन्स बजावले होते, एका वकिलाने केलेल्या तक्रारीनंतर, ज्यांनी आरोप केला होता की या प्लॅटफॉर्मने कोल्डप्लेच्या कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केला होता.
हेही वाचा >> विश्लेषण: ‘कोल्डप्ले’चे गारुड नक्की किती मोठे आहे?
पोलीस काय म्हणाले?
मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हेमराजानी आणि तांत्रिक प्रमुख यांनी समन्सचे पालन केले नाही. त्यामुळे शनिवारी पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. आता नव्याने समन्स जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वकिलाने दिलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की वकील अमित व्यास यांनी सांगितले कोल्ड प्लेची तिकिटे काही संकेतस्थळावर अडीच हजारांना विकली जात होती. तर काही ठिकाणी ही तिकिटे तीन लाखांवर विकली गेली. त्यामुळे BookMyShow विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बुक माय शोच्या प्रवक्त्याने काय म्हटलंय?
BookMyShow च्या प्रवक्त्याने सांगितले की, “तिकीट विक्रीसाठी आम्ही BookMyShow मध्ये, अनेक परिश्रम केले आहेत. प्रत्येक चाहत्याला तिकिटे सुरक्षित करण्याची वाजवी संधी मिळावी यासाठी सर्व शोमध्ये प्रति वापरकर्ता ४ तिकिटांची मर्यादा घालून, स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन देण्यात आले आहे. तिकिट विक्रीसाठी व्यवस्था करून ठेवली होती. त्यामुळे बुकिंगसाठी थोडा विलंब झाला.
“BookMyShow चा अशा कोणत्याही अनधिकृत तिकीट विक्री/पुनर्विक्रीच्या प्लॅटफॉर्मशी कोणताही संबंध नाही. भारतात तिकिटांचा काळा बाजार करणे अनधिकृत आहे. आम्हीही काळा बाजार प्रथेला विरोध करतो. याविरोधात आम्ही तक्रारही केली आहे.
“आम्ही केवळ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली नाही तर या प्रकरणातील तपासाला सहकार्य करत आहोत. आमच्या ग्राहकांना, आम्ही पुन्हा सांगू इच्छितो की त्यांनी इतर कोणत्याही अनधिकृत संकेतस्थळावर तिकिटे बुक केली असती तर ती बनावट किंवा अवैध असू शकतील.