डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना गुरूवारी गुगलकडून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. गुगलच्या होमपेजवर गुरूवारी सकाळपासून एक काळी फीत लावलेली पहायला मिळत आहे. माऊसचा कर्सर या फितीजवळ नेल्यास ‘इन मेमरी ऑफ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम’ असा संदेश पहायला मिळत आहे. कलाम यांच्यावर आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर कलाम यांना गुगलने श्रद्धांजली वाहिली आहे. गुगलकडून अनेक गोष्टींचे औचित्य साधून होमपेजवर करण्यात येणाऱ्या सर्जनात्मक सादरीकरणाला नेहमीच इंटरनेट युजर्सकडून पसंती दिली जाते. भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रात कलाम यांनी दिलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण योगदानामुळे ते जगभरात ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच कलाम यांच्या निधनानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर शोक व्यक्त करण्यात आला होता. शिलाँग येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेण्ट’मध्ये सोमवारी डॉ. कलाम यांचे व्याख्यान होते. त्यासाठी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तेथे आल्यानंतर त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी त्यांच्या व्याख्यानास प्रारंभ झाला आणि काही वेळातच ते जागीच कोसळले. साधारण सातच्या सुमारास त्यांना बेथनी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. मात्र, पावणेआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा