मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने काळ्या यादीतील ठेकेदारांना दिलेली कंत्राटे अखेर रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. मुंबई उच्च न्यायालयाने के.आर. कन्स्ट्रक्शन, आर.के. मदानी कन्स्ट्रक्शन, जे. कुमार कन्स्ट्रक्शन , रेलकॉन कन्स्ट्रक्शन, आर.पी.शहा कन्स्ट्रक्शन या सहा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले होते. न्यायालयाने काळ्या यादी टाकले असताना मुंबई महानगरपालिकेने पुन्हा काम दिल्याचे समोर आले होते. स्थायी समितीने प्रस्ताव सादर करून त्याला शिवसेना-भाजपने मंजुरीही दिली होती. मात्र उच्च न्यायालयाने यावेळी घोटाळेबाजांना पालिका पुन्हा पुन्हा कामे देतेच कसे? असा प्रश्र्न विचारत पालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली होती. या कंत्राटदारांनी पालिकेला तब्बल ३५२ कोटींचा चुना लावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in