मुंबई : मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी – मस्जिद दरम्यान २५, २६, २७ जानेवारी आणि १, २, ३ फेब्रुवारी रोजी मोठा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅक कालावधीत मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावरील लोकल सीएसएमटी – भायखळा दरम्यान उपलब्ध नसतील. तर, हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड – सीएसएमटी दरम्यान उपलब्ध नसतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा – सीएसएमटी स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड – सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा या स्थानकांवरून सुटतील. तर, हार्बर मार्गावरील लोकल वडाळा येथून पनवेलच्या दिशेने धावतील. डाऊन धीम्या मार्गावरील टिटवाळा-सीएसएमटी लोकल रात्री १०.५० वाजता सुटेल आणि टिटवाळा येथे रात्री १२.३३ वाजता पोहोचेल. डाऊन जलद मार्गावरील कसारा- सीएसएमटी लोकल १०.४७ वाजता सुटेल आणि कसारा येथे रात्री १.१२ वाजता पोहचेल. अप धीम्या मार्गावरील कल्याण-सीएसएमटी लोकल रात्री ९.१६ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री १०.४५ वाजता पोहचेल. अप जलद मार्गावरील कल्याण-सीएसएमटी लोकल रात्री १०.०२ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथ रात्री ११.०४ वाजता पोहचेल. डाऊन धीम्या मार्गावरील अंबरनाथ- सीएसएमटी येथून पहाटे ५.४० वाजता सुटेल आणि अंबरनाथ येथे सकाळी ७.२३ वाजता पोहोचेल. डाऊन जलद मार्गावरील कर्जत- सीएसएमटी येथून पहाटे ५.४६ वाजता सुटेल आणि कर्जत येथे सकाळी ७.४३ वाजता पोहोचेल. अप धीम्या मार्गावर ठाणे येथून पहाटे ४.४८ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे पहाटे ५.४६ वाजता पोहोचेल. अप जलद मार्गावरील ठाणे येथून पहाटे ५.०८ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे पहाटे ५.५२ वाजता पोहोचेल.
हार्बर मार्गावरील ब्लाॅकनंतरच्या शेवटच्या लोकल
सीएसएमटी येथून सकाळी १०.५८ वाजता लोकल सुटेल आणि पनवेल येथे रात्री १२.१८ वाजता पोहोचेल. सीएसएमटी येथून रात्री १०.५४ वाजता लोकल सुटेल आणि गोरेगाव येथे रात्री ११.४९ वाजता पोहोचेल. पनवेल येथून रात्री ९.३९ वाजता लोकल सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री १०.५८ वाजता पोहचेल. वांद्रे टर्मिनस येथून रात्री १०.२४ वाजता लोकल सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री १०.५४ वाजता पोहोचेल.
हार्बर मार्गावरील ब्लाॅकनंतरच्या पहिल्या लोकल
सीएसएमटी येथून सकाळी ६ वाजता लोकल सुटेल आणि सकाळी ७.२० वाजता पनवेल येथे पोहोचेल. सीएसएमटी येथून पहाटे ५.५० वाजता लोकल सुटेल आणि सकाळी ६.४४ वाजता गोरेगाव येथे लोकल पोहोचेल. बेलापूर येथून पहाटे ४.५३ वाजता लोकल सुटेल आणि सीएसएमटी येथे पहाटे ५.५६ वाजता पोहोचेल. गोरेगाव येथून पहाटे ५.०५ वाजता लोकल सुटेल आणि सीएसएमटी येथे सकाळी ६ वाजता लोकल पोहोचेल. ब्लाॅक कालावधीत अनेक रेल्वेगाड्यांच्या थांब्यात, वेळेत बदल करण्यात आला आहे.