लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. या कामानिमित्त पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी आणि शनिवार रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेच्या ३०० हून अधिक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
माहीम – वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या तुळया उभारण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी लोकलचा प्रवास विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकातील एकूण ३३४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. परंतु, प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त ११० लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे ब्लॉक कालावधीत सुमारे २२४ लोकल फेऱ्या रद्द राहतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
शुक्रवारी ११ एप्रिल रोजी पहिला ब्लॉक घेतला जाईल.
कुठे : पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर
कधी : शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत
कुठे : पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शुक्रवारी रात्री १२.३० ते शनिवारी सकाळी ६.३० वाजेपर्यंत
परिणाम :
- शुक्रवारी रात्री १०.२३ ते रात्री ११.५८ पर्यंत चर्चगेट स्थानकातून सुटणाऱ्या सर्व डाऊन धीम्या आणि चर्चगेटच्या दिशेला येणाऱ्या सर्व अप धीम्या लोकल मुंबई सेंट्रल – सांताक्रूझदरम्यान जलद मार्गावरून धावतील. परिणामी, या लोकल महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहीम आणि खार रोड स्थानकांत थांबणार नाहीत.
- शुक्रवारी रात्री १०.२३ वाजता चर्चगेटवरून शेवटची धीमी लोकल भाईंदरसाठी सुटेल.
- शुक्रवारी रात्री ११.४० वाजता चर्चगेटवरून शेवटची जलद लोकल विरारसाठी सुटेल.
- चर्चगेटवरून विरारसाठी रात्री ११.५८ वाजता सुटणारी लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझदरम्यान जलद मार्गावर धावेल. त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहीम आणि खार रोड स्थानकांवर थांबणार नाही.
- शुक्रवारी बोरिवलीहून चर्चगेटसाठी शेवटची धीमी लोकल रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही लोकल सुटल्यानंतर, ब्लॉक कालावधीतील उर्वरित लोकल सांताक्रूझ आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर धावतील. त्यामुळे खार रोड, माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी स्थानकांवर थांबणार नाहीत.
- विरार- चर्चगेटदरम्यान शुक्रवारी १२.०५ वाजता शेवटची लोकल धावेल.
- ब्लॉक कालावधीत चर्चगेट – दादरदरम्यान जलद मार्गावर लोकल चालवल्या जातील.
- ब्लॉक काळात गोरेगाव – वांद्रे दरम्यान लोकल हार्बर मार्गावर चालवल्या जातील.
- विरार – अंधेरीदरम्यान लोकल धीम्या आणि जलद मार्गावर चालवल्या जातील.
- विरार – चर्चगेटदरम्यान शनिवारी पहाटे ०५:४७ वाजता पहिली लोकल सुटेल.
- भाईंदर स्थानकातून शनिवारी सकाळी ६.१० वाजता पहिली चर्चगेट लोकल रवाना होईल. ही लोकल सांताक्रूझ – मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावरून धावेल. त्यामुळे ती खार रोड, माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी स्थानकांवर थांबणार नाही.
- बोरिवली – चर्चगेटदरम्यान शनिवार सकाळी ८.०३ वाजता पहिली धीमी लोकल सुटेल.
- चर्चगेट स्थानकातून पहिली जलद लोकल सकाळी ६.१४ वाजता बोरिवलीकरिता सुटेल. मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावर धावेल आणि त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर थांबणार नाही.
- चर्चगेट – विरार पहिली जलद लोकल शनिवारी सकाळी ६.१५ सुटेल
- चर्चगेट -बोरिवलीदरम्यान शनिवारी सकाळी ८.०३ वाजता पहिली धीमी लोकल सुटेल.
शनिवारी १२ एप्रिल रोजी दुसरा ब्लॉक
कुठे : अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत
कुठे : अप जलद मार्गावर
कधी : शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत
परिणाम :
- ब्लॉक कालावधीत चर्चगेट – दादरदरम्यान लोकल जलद मार्गावर धावतील.
- ब्लॉक कालावधीत शनिवार रात्री/रविवार सकाळी डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरिवलीवरून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत धावतील.
- गोरेगाव – वांद्रे/ माहीमदरम्यानची लोकल सेवा हार्बर मार्गावर चालवण्यात येतील.
- चर्चगेट – विरारदरम्यान शनिवारी रात्री १०.५३ वाजता शेवटची लोकल धावेल.
- बोरिवली – चर्चगेट दरम्यान शनिवारी रात्री १०.४९ वाजता शेवटची धीमी लोकल धावेल.
- विरारवरून चर्चगेटला शनिवारी रात्री १०.२४ वाजता शेवटची जलद लोकल धावेल.
- विरारवरून वांद्रेला शनिवारी रात्री १२.०५ वाजता शेवटची लोकल धावेल.
- चर्चगेट – विरारदरम्यान शनिवारी रात्री ११.०५ वाजता शेवटची जलद लोकल धावेल.
- हार्बर मार्गावर माहिमवरून शनिवारी रात्री १२.११ वाजता शेवटची लोकल गोरेगावसाठी धावेल.
- वांद्रे – विरारदरम्यान शनिवारी रात्री १.३० वाजता शेवटची लोकल धावेल.
- विरार – चर्चगेटदरम्यान रविवारी सकाळी ८.०८ वाजता पहिली धीमी लोकल धावेल.
- वसई रोड – चर्चगेटदरम्यान रविवारी सकाळी ८.१४ वाजता पहिली लोकल धावेल.
- विरार – चर्चगेटदरम्यान रविवारी सकाळी ८.१८ वाजता पहिली जलद लोकल धावेल.
- भाईदर – चर्चगेटदरम्यान रविवारी सकाळी ८.२४ वाजता पहिली लोकल धावेल.
- चर्चगेट – विरारदरम्यान रविवारी सकाळी ९.०३ वाजता पहिली जलद लोकल धावेल.
- चर्चगेटहून बोरिवलीला जाणारी पहिली धीमी लोकल रविवारी सकाळी ९.०४ वाजता धावेल.