मुंबई : कोकण रेल्वेवरील वीर – खेड रेल्वे स्थानकांदरम्यान उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी ७ जुलै रोजी तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे चार रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वीर – खेड विभागादरम्यान ७ जुलै रोजी दुपारी १२.२० ते दुपारी ३.२० या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे ६ जुलै रोजी सुटणारी गाडी क्रमांक २०९१० पोरबंदर – कोच्युवेली एक्स्प्रेस रोहा – वीर विभागादरम्यान १ तास ५० मिनिटे थांबविण्यात येईल. तसेच ६ जुलै रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२४३२ तिरुवनंतपुरम -निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी – खेड विभागादरम्यान ३० मिनिटे थांबविण्यात येणार आहे. तसेच ७ जुलै रोजी सुटणारी गाडी क्रमांक १६३४५ तिरूअनंतपुरम – एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेसही रोहा – वीर विभागात ३५ मिनिटे थांबविण्यात येणार आहे.

हेही वाचा – मुंबई: विनातिकीट प्रवाशांची दंड वसुली आता ‘पेमेंट स्कॅनर ॲप’द्वारे

७ जुलै रोजी सुटणारी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी – दिवा पॅसेंजर ही रत्नागिरी – खेड विभागात १ तास ५ मिनिटे थांबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.