मुंबई : मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळई उभारण्यासाठी वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री १०.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत सहा तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि सहाव्या मार्गिकेवर ब्लाॅक असेल. त्यामुळे लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रान्सहार्बर मार्गावरील कोपर खैरणे ते ठाणे अप आणि डाऊन आणि मुख्य मार्गिकेच्या दिवा ते मुलुंड सहाव्या मार्गावर ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ब्लाॅक कालावधीत पुलाची तुळई उभारण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे सहाव्या मार्गावरील चालवण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्या कल्याण / दिवा ते मुलुंड / विद्याविहार स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर, शनिवारी रात्री १०.०१ ते मध्यरात्री १२.०५ दरम्यान ठाणे ते वाशी / पनवेल लोकल, रात्री ९.३७ पासून वाशी ते ठाणे आणि रात्री ११.१८ पर्यंत पनवेल ते ठाणे लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – मुंबई : घाटकोपरमध्ये तरुणाची हत्या

हेही वाचा – मुंबई : साडेसात वर्षांत कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे केवळ ४६ टक्के काम पूर्ण

डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ठाणे येथून रात्री ९.४१ वाजता सुटेल आणि वाशी येथे रात्री १०.१० वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून रात्री ९.२४ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ९.५३ वाजता पोहोचेल. डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे येथून पहाटे ५.१२ वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी ६.०४ वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशी येथून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे सकाळी ६.५९ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Block for erecting bridge girder at thane station mumbai print news ssb